आष्टा शहरात विकासकामांबाबत फलक लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:28 AM2021-01-23T04:28:02+5:302021-01-23T04:28:02+5:30
आष्टा : येथील निशिकांतदादा युथ फाऊंडेशन व भाजपच्यावतीने आष्टा शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांबाबत फलक लावण्यात ...
आष्टा : येथील निशिकांतदादा युथ फाऊंडेशन व भाजपच्यावतीने आष्टा शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांबाबत फलक लावण्यात यावेत, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, आष्टा शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावेत. ठेकेदाराचे नाव, कामाची रक्कम, मुदत, करारनामा संदर्भ, कार्यारंभ आदेशाची तारीख, कामाची तारीख, कालावधी, काम पूर्ण होण्याची तारीख, दोषदायित्व कालावधी, याबाबतचा माहितीचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
संस्थापक-अध्यक्ष प्रवीण माने, अविनाश काळोखे, सचिन रासकर, शोएब सनदे, दत्ता कोळेकर, अरबाज मुजावर, विशाल आडके, रूतिक जगदाळे, शिवप्रसाद भोसले, अनिकेत खोत उपस्थित होते.
फोटो : आष्टा येथे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन देताना प्रवीण माने, अविनाश काळोखे, सचिन रासकर, शोएब सनदे, दत्ता कोळेकर, अरबाज मुजावर.