डाेळ्यात चटणी टाकून अडीच काेटींचे साेने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:29+5:302021-01-16T04:30:29+5:30

जत : जत ते सांगोला रस्त्यावर जत शहरापासून दाेन किलाेमीटर अंतरावर माळी वस्तीनजीक रस्त्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या सराफ व्यावसायिकास डोळ्यांत ...

Put chutney in the dal and light the lamp with the help of two and a half katis | डाेळ्यात चटणी टाकून अडीच काेटींचे साेने लंपास

डाेळ्यात चटणी टाकून अडीच काेटींचे साेने लंपास

googlenewsNext

जत : जत ते सांगोला रस्त्यावर जत शहरापासून दाेन किलाेमीटर अंतरावर माळी वस्तीनजीक रस्त्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या सराफ व्यावसायिकास डोळ्यांत चटणी टाकून लुटण्यात आले. व्हॅनमधून आलेल्या चाैघा दरोडेखोरांनी सुमारे २ कोटी ३३ लाख रुपये किमतीची ४ किलो ६०० ग्राम सोन्याची बिस्किटे हातोहात लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री एक वाजता घडली. याप्रकरणी बाळासाहेब वसंत सावंत (वय ३५, रा. पळसखेल, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यातील सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब सावंत हे अन्य एका सहकाऱ्यांसह गुरुवारी सायंकाळी बेळगांव (कर्नाटक) येथून २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे घेऊन माेटारीतून शेगाव (ता. जत) येथील सराफ व्यापारी संजय नलवडे यांना देण्यासाठी येत होते. एका कापडी बॅगेत त्यांनी ही बिस्किटे ठेवली हाेती. मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान माळी वस्तीनजीक रस्त्याच्या कडेला माेटार उभी करून दाेघे लघुशंकेसाठी थांबले. यावेळी त्यांच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाची एक व्हॅन येऊन थांबली. त्यातून तोंडावर कापड बांधलेले ३० ते ३५ वयोगटातील चाैघे संशयित उतरले. त्यांनी सावंत व त्यांच्या सहकाऱ्याच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना बेदम मारहाण सुरू केली. त्यांनी आरडाओरडा करून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत माेटारीतील २ कोटी ३३ लाख १३ हजार ५०० रुपये किमतीचे सोने घेऊन संशयितांनी जत शहराच्या दिशेने पलायन केले. जाताना दरोडेखोरांनी दोघांचे मोबाईल फोनही हिसकावून घेतले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी त्वरित परिसरात नाकाबंदीचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, हवालदार बजरंग थोरात, उमर फकीर यांच्यासमवेत तत्काळ घटनास्थळी भेट देऊन दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु यश आले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव व आटपाडी येथे पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.

फाेटाे : १५ जत १

Web Title: Put chutney in the dal and light the lamp with the help of two and a half katis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.