टेंभूच्या प्रश्नावर विट्यात धरणे
By admin | Published: October 18, 2016 12:37 AM2016-10-18T00:37:47+5:302016-10-18T00:42:54+5:30
राष्ट्रवादीचे आंदोलन : योजनेचे वीज बिल भरण्याची मागणी
विटा : कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी शासनाने वीज बिल भरून टेंभू योजनेच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुष्काळी भागाला द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी विटा तहसील कार्यालयासमोर खानापूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
टेंभू योजनेचे वीजबिल शासनाकडून भरून दुष्काळी भागातील तलाव भरून दिले जातील, असे आश्वासन विधिमंडळ अधिवेशनात दिले होते. मात्र, त्याबाबतचे आदेश शासनाने पाटबंधारे विभागाला दिले नाहीत. त्यामुळे या पाण्याचे पैसे शासन सरकारकडून वसूल करून घेण्याची शक्यता व्यक्त करून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
या आंदोलनात जि. प. सदस्य किसन जानकर, माणिकराव पाटील, अजित जाधव, सौ. सुवर्णा पाटील, बबन हसबे, तुकाराम जाधव, रेवण सूर्यवंशी, श्रीरंग माने, दिलीप जगताप, राजकुमार जगताप, हिंमतराव पाटील, नानासाहेब मंडलिक, जोतिराम गुजले, सुलोचना भारते, किसन गायकवाड, अक्षय जाधव, कुंडलिक साळुंखे, सर्जेराव मदने, महादेव निकम, दत्तात्रय मुळीक, संतोष चव्हाण, गजानन जाधव, दीपक काटकर, महेंद्र पाटील, निखिल गायकवाड, वसंत माने, राजेंद्र कदम, विशाल साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना आंदोलनकर्त्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)
वकिलांचा पाठिंबा
बाबासाहेब मुळीक यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन, टेंभूचे पाणी देण्यासाठी वीज बिल शासनाने भरावे, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी १० वाजता विटा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्ष वैभव पाटील व विटा बार संघटनेने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.