प्रा. अरुण चव्हाण यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:50+5:302021-05-24T04:25:50+5:30
सांगली : येथील वेरळा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या ...
सांगली : येथील वेरळा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
प्रा. चव्हाण यांनी औरंगाबाद विद्यापीठात असिस्टंट रजिस्ट्रार व सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केले होते. सन १९६९ मध्ये वेरळा विकास संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालिन खानापूर तालुक्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची पाणी समस्या सोडविण्यासाठी आळसंद, वाझर, कमळापूर आदी भागांत लोकसहभागातून कार्यकर्त्यांची फौज उभी केली. संस्थेने शेतकऱ्यांसाठी ३७ नाला बंधारे, दोन पाझर तलाव, रस्ते, शाळा अशी कामे उभारली.
प्रा. चव्हाण यांनी आरोग्य, शिक्षणक्षेत्रातही मोलाचे काम केले. गरीब मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. आठ वर्षे एचआयव्ही व एडस्संबंधी जनजागृती व प्रबोधन केले. अनेक संशोधनात्मक निबंध व ललितलेखन केले. तिमीरभेद या कादंबरीचा त्यात समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्कार, पारितोषिके मिळाली.