शिराळा तालुक्यातील शाळेचा दर्जा सुधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:56+5:302020-12-24T04:23:56+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा चांगला असून, भविष्यकाळात तो उंचाविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नूतन ...

The quality of schools in Shirala taluka will improve | शिराळा तालुक्यातील शाळेचा दर्जा सुधारणार

शिराळा तालुक्यातील शाळेचा दर्जा सुधारणार

Next

शिराळा : शिराळा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा चांगला असून, भविष्यकाळात तो उंचाविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नूतन नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम यांनी केले.

शिराळा तालुका शिक्षक संघाच्यावतीने नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्य संपर्कप्रमुख राजकुमार पाटील होते. निकम म्हणाल्या की, शिराळा तालुका डोंगरी तालुका असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी -सुविधा देण्याचे काम पुढील काळात केले जाईल. नगराध्यक्ष पदाचा वापर जनतेची सेवा करण्यासाठी केला जाईल, असे सांगितले. उपनगराध्यक्ष विजय दळवी म्हणाले की, शिराळा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांचे काम आदर्शवत असून, विविध स्पर्धेत विद्यार्थी चमकत आहेत. यावेळी नगराध्यक्षा यांचा सत्कार राजकुमार पाटील, तर उपनगराध्यक्ष विजय दळवी यांचा सत्कार उत्तम कदम यांच्याहस्ते करण्यात आला . प्रास्ताविक सरचिटणीस मोहन पवार यांनी केले, तर आभार जिल्हा नेते प्रकाश जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सावंत यांनी केले. कार्यक्रमास उत्तम कदम, राजेंद्र निकम, प्रतिभा दळवी, दादासाहेेब पाटील, जितेंद्र परदेशी, सुनील झिमूर उपस्थित होते .

फोटो ओळी - शिराळा येथे नूतन नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी यांचा सत्कार राजकुमार पाटील, प्रकाश जाधव, मोहन पवार, कृष्णा सावंत, उत्तम कदम आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

Web Title: The quality of schools in Shirala taluka will improve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.