शालेय शिक्षणाबरोबरच दर्जेदार आध्यात्मिक शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:36+5:302021-08-21T04:30:36+5:30
मणदूर (ता. शिराळा) येथील ह. भ. प. अनिल महाराज देवळेकर यांनी स्थापन केलेल्या गोपालकृष्ण वारकरी ज्ञानमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत ...
मणदूर (ता. शिराळा) येथील ह. भ. प. अनिल महाराज देवळेकर यांनी स्थापन केलेल्या गोपालकृष्ण वारकरी ज्ञानमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निखिल जैन (कराड), ह.भ.प. अमोल गंगावणे, ह.भ.प. शामराव आळंदीकर, अनंत सपकाळ, भगवान घराळ, बजरंग पाटील यांच्या हस्ते फीत कापून ज्ञानमंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अनिल देवळेकर म्हणाले, मुलांना शालेय शिक्षण देण्याबरोबरच त्यांना व्यसनमुक्त बनवून देव, देश, धर्माविषयी प्रेम, आदर, श्रद्धा निर्माण व्हावी. पैशाविना गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे. हाच या ज्ञानमंदिराचा उद्देश आहे.
येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच मोफत हार्मोनियम, गायन, तबला, मृदंग, प्रवचन व कीर्तन यासह आध्यात्मिक शिक्षण देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास कळवा (ठाणे) येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीसह ज्ञानेश्वर भजनी मंडळ, गणेश व दुर्गामाता मंडळाने कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रमास शिराळा, वाळवा, शाहुवाडी, पाटण तालुक्यातील वारकरी सांप्रदायातील भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : २० वारणावती १
ओळ : मणदूर (ता. शिराळा) येथील गोपालकृष्ण वारकरी ज्ञानमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी निखिल जैन, अमोल गंगावणे, अनंत सपकाळ, भगवान घराळ, अनिल देवळेकर, बजरंग पाटील आदी उपस्थित हाेते.
200821\img-20210820-wa0076.jpg
मणदुर गोपालकृष्ण वारकरी ज्ञानमंदीर उद्घाटन फोटो