धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:05+5:302021-09-24T04:31:05+5:30

कवठेमहांकाळ : धनगर समाजासाठी आदिवासी गटातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र यशवंत सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात ...

Quickly implement the reservation | धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा

धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा

Next

कवठेमहांकाळ : धनगर समाजासाठी आदिवासी गटातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र यशवंत सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र यशवंत सेनेने दिला आहे. याबाबत कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जी. गोरे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्वच राजकीय पक्ष धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक करत आहेत. महाआघाडी सरकारने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या धर्तीवर तातडीने धनगर समाजाच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी. अन्यथा धनगर समाज निवडणुकीमध्ये महाआघाडी सरकारला धडा शिकवेल.

या निवेदनावर महाराष्ट्र यशवंत सेनेचे तालुकाध्यक्ष अमोल मोटे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खामकर, संतोष चौगुले, योगेश खोत, दीपक पाटोळे, अनिल चौगुले, सुनील पाटील, सुरज शेजाळ, हर्षवर्धन चौगुले, अरुण एडके यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Web Title: Quickly implement the reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.