ज्याेतिषशास्त्राच्या प्रसारासाठी आर. जे. दवे सांगलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:00+5:302020-12-29T04:26:00+5:30
सांगली : ज्याेतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गुजरात ज्याेतिष परिषदेचे माजी अध्यक्ष डाॅ. आर. जे. दवे हे सध्या सांगली ...
सांगली : ज्याेतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गुजरात ज्याेतिष परिषदेचे माजी अध्यक्ष डाॅ. आर. जे. दवे हे सध्या सांगली येथील जुने रल्वे स्टेशन राेडवरील हाॅटेल लाेटर येथे आले आहेत. ज्याेतिष शास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. वास्तुशास्त्र या विषयात त्यांनी पीएच. डी. केली आहे.
अर्थशास्त्राचे पदवीधर असलेल्या डाॅ. दवे यांनी १९८१पासून ज्योतिष व्यवसायाला सुरूवात केली. १९८५ मध्ये आफ्रिका ॲस्ट्राे रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारा ज्याेतिष शास्त्रातील सखाेल अभ्यासाबाबत सुवर्णपदक देऊन त्यांना गाैरविण्यात आले हाेते. पंजाब, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, राजस्थानसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरून लाेकांच्या शंकांचे ते समाधान करत असतात.
आजवर शंकराचार्यांसह अनेक मान्यवरांच्या पत्रिका पाहून त्यांनी भविष्य कथन केले आहे. ज्याेतिष हे गणितावर आधारलेले एक शास्त्र आहे. त्याला दैवी उपासना व आराधनेची जाेड आहे. मात्र, लाेकांच्या भावूकतेचा फायदा घेऊन काही लाेक या शास्त्राला बदनाम करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. २० जानेवारीपर्यंत डाॅ. दवे यांचा सांगली येथे मुक्काम राहणार आहे.
फोटो-२८आर. जे. दवे