आर. आर. आबांमुळेच ग्रामविकासाची ओळख
By admin | Published: June 30, 2016 11:25 PM2016-06-30T23:25:47+5:302016-06-30T23:33:04+5:30
चंद्रकांत दळवी : विट्यात ग्रामविकास प्रबोधिनीचा कार्यक्रम
विटा : आर. आर. पाटील (आबा) यांनी गावकेंद्रित विकासाच्या योजना राबवून काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले. परिणामी, त्यांच्या ग्रामस्वच्छता अभियानाची दखल युनोने घेतली. त्यामुळे संपूर्ण जगाला ग्रामविकासाची खरी ओळख झाली, असे प्रतिपादन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
येथे अमृतवेल प्रतिष्ठान आणि ग्रामविकास प्रबोधिनीच्यावतीने गुरूवारी ‘ग्रामगौरव’ पुरस्काराचे वितरण चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक, भाई संपतराव पवार, रवींद्र देशमुख, किसन जानकर, नगरसेवक किरण तारळेकर, बाळासाहेब लकडे, कुसूमताई मोटे, धर्मेंद्र पवार प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमास दादासाहेब यादव, दयानंद लोंढे, संदीप मुळीक, माणिकराव पाटील, अजित जाधव, पद्माकर यादव, सुवर्णा पाटील, हिंमतराव पाटील, आकाश सरगर उपस्थित होते. दीपक पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
‘ग्रामगौरव’ : पुरस्काराने यांचा झाला सन्मान
नरेंद्र पाटील, पृथ्वीराज यादव, शैला भिसे, अभिजित नलवडे, बलवडी (खा.) ग्रामपंचायत, चारगाव जलयुक्त शिवार अभियान (ता. माण), आम्ही हिंंगणगावकर गु्रुप (हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ), पृथ्वीसंग्राम सामाजिक संस्था (कडेपूर), जिल्हा परिषद शाळा (चिंचणी मं.), दक्षिण भाग विकास सोसायटी (भिलवडी) यांना गुरूवारी ‘ग्रामगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले.