आर. आर. पाटील यांचा राजकीय वारसा रोहितकडे-आव्हान बालेकिल्ला राखण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:14 AM2018-12-26T00:14:23+5:302018-12-26T00:15:45+5:30

दत्ता पाटील। तासगाव : राष्टÑवादीचा तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्याचा वारसदार निश्चित झाला आहे. आबाप्रेमींच्या पोटातील नाव राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ...

R. R. Keeping Patil's political heritage Rohit-Challenge | आर. आर. पाटील यांचा राजकीय वारसा रोहितकडे-आव्हान बालेकिल्ला राखण्याचे

आर. आर. पाटील यांचा राजकीय वारसा रोहितकडे-आव्हान बालेकिल्ला राखण्याचे

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून शिक्कामोर्तब

दत्ता पाटील।
तासगाव : राष्टÑवादीचा तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्याचा वारसदार निश्चित झाला आहे. आबाप्रेमींच्या पोटातील नाव राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ओठावर आले. यावेळी सुमनताई, तर पुढच्या निवडणुकीत रोहितची उमेदवारी असल्याचे जाहीर केले. वारसदार ठरल्याने राष्टÑवादीच्या गोटात उत्साह असला तरी, वारसदार मैदानात उतरेपर्यंत, येणाऱ्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या शिलेदारांना गड शाबूत ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ राष्टÑवादीचा बालेकिल्ला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर मतदारसंघाची जबाबदारी सुमनताई पाटील यांच्यावर आली. बहुतांश सर्वच पक्ष आणि विरोधकांनी सुमनतार्इंच्या पहिल्या निवडणुकीला विरोध करायचे टाळले. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने सुमनतार्इंचा विजय झाला.

राजकारणाचा कोणताही अनुभव नसतानादेखील त्यांनी आमदारकीची धुरा पेलली. अनुभवी कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आबांच्या वारशावर त्यांनी धुरा पुढे नेण्याचे काम केले. मात्र आबांच्या पश्चात मतदारसंघात मोठमोठे भगदाड पडले. अनेक निष्ठावंतांनी सत्तेचा गड जवळ करत, भाजपशी घरोबा केला. अशा परिस्थितीतदेखील स्थानिक निवडणुकांत सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले.

आमदार सुमनतार्इंना त्यांच्या कार्यात मर्यादा असल्याचेही अनेकदा दिसून आले. मात्र आबांच्या शिलेदारांनी त्यांना रसद देऊन अस्तित्व कायम ठेवले. यावेळच्या विधानसभेसाठी सुमनतार्इंशिवाय राष्टÑवादीकडे दुसरा सर्वमान्य पर्याय नाही. त्यामुळे यावेळी सुमनतार्इंना आमदार करण्याचे आवाहन करत, पुढच्यावेळी मात्र आबांचा वारसदार म्हणून त्यांचे पुत्र रोहित पाटील यांना मैदानात उतरविण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. आबांचा वारसदार म्हणून रोहितचे नाव घेतल्यानंतर, आबाप्रेमींच्यात चैतन्य संचारले आहे. येत्या काळात नेतृत्व सक्षम करण्याच्या दृष्टिनेच पावले टाकली जातील.

आबांच्या पश्चात रोहित पाटील यांनी कमी वयात देखील जबाबदारीचे भान बाळगून राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे. आबांची विचारसरणी आचरणात आणून वक्तृत्वाची छाप पाडून लोकांची मने जिंकल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आर. आर. पाटील यांची जागा रोहित पाटील घेऊ शकतात, याची कार्यकर्त्यांनाही खात्री आहे. किंबहुना रोहितशिवाय दुसरा पर्यायदेखील नाही. त्यामुळेच रोहित नेतृत्व करू शकेल, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.

विधानसभेपूर्वी लोकसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. राष्टवादीच्याविरोधात खासदार संजयकाका पाटील यांनी सत्तेचा फायदा घेत भक्कम आव्हान उभारले आहे. त्यामुळे रोहित राजकारणात सक्रिय होईपर्यंत सुमनतार्इंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून राष्टÑवादीचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान कार्यकर्त्यांनाच पेलावे लागणार आहे.

भाजपकडून उमेदवारी कोणाची?
विधानसभेसाठी राष्टÑवादीकडून सुमनताई रिंगणात उतरणार आहेत. इतकेच नव्हे, तर पुढच्यावेळच्या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या उमेदवारीवर देखील शिक्कामोर्तब झाले. मात्र राष्टÑवादीला तगडे आव्हान देणाºया भाजपकडून विधानसभेची उमेदवारी कोणाची? याचे उत्तर भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील मिळालेले नाही. तशी अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी, लोकसभा निवडणुकीनंतरच उमेदवारीचे पत्ते उघड होतील. त्यानंतरच सुमनतार्इंना कोणाचे आव्हान असेल, हे स्पष्ट होईल.

Web Title: R. R. Keeping Patil's political heritage Rohit-Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.