अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:31 AM2019-11-04T11:31:36+5:302019-11-04T11:34:09+5:30
यावर्षी मान्सून पाऊस वेळेत झाला नसल्यामुळे खरीप हंगामाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथील पिके परतीच्या मुसळधार पावसामुळे कुजू लागली आहेत. अनेक जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनी तयार करण्यासाठी वाफसाच नसल्यामुळे रब्बी पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली : यावर्षी मान्सून पाऊस वेळेत झाला नसल्यामुळे खरीप हंगामाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथील पिके परतीच्या मुसळधार पावसामुळे कुजू लागली आहेत. अनेक जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनी तयार करण्यासाठी वाफसाच नसल्यामुळे रब्बी पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणीवर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आजमितीस ज्वारी व हरभरा पेरणीला सुरुवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली तरी चालणार आहे. या पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात मात्र हीच पिके शेतात उभी असल्याने रब्बी हंगामासाठी शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जोपर्यंत वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. येत्या दहा दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणात ऊन पडले तर वाफसा होणार आहे.