कृषी उत्पन्न बाजार समितीचे राहुल साळुंखे सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:25 AM2021-04-17T04:25:42+5:302021-04-17T04:25:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कमळापूर (ता. खानापूर) येथील राहुल साळुंखे यांची एकमताने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कमळापूर (ता. खानापूर) येथील राहुल साळुंखे यांची एकमताने निवड झाली. तत्कालीन सभापती बापूराव शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाची निवड प्रक्रिया गुरुवारी पूर्ण करण्यात आली. खानापूर व कडेगाव या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे.
या पदाची निवड प्रक्रिया गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पूर्ण करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून सहायक निबंधक युसूफ शेख यांनी काम पाहिले. या पदासाठी कमळापूर येथील राहुल साळुंखे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पीठासन अधिकारी शेख यांनी साळुंखे यांची सभापती पदी बिनविरोध निवड जाहीर केली. या निवडीनंतर नूतन सभापती साळुंखे यांनी आ. अनिल बाबर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
या निवडीनंतर आ. अनिल बाबर, सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर यांच्या हस्ते साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हेमंत बाबर, पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, संचालक चंद्रकांत चव्हाण, बापूराव शिंदे, राजेश कदम, अंकुश यादव, विलास साळुंखे, रामचंद्र भिंगारदेवे, महेश पवार, सुभाष साळुंखे, राजाभाऊ शिंदे, किशोर नलवडे, आनंदा जाधव, नामदेव शिरतोडे, राजू गोतपागर, विशाल साळुंखे, भीमराव साळुंखे, आदी उपस्थित होते.