राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राहुल, सम्राट महाडिक करणार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:27 PM2022-04-06T14:27:55+5:302022-04-06T14:28:43+5:30

शिराळा येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिवाजीराव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पेठनाक्यावरील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा चर्चेचा ठरणार आहे.

Rahul, Samrat Mahadik will demonstrate in NCP stronghold | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राहुल, सम्राट महाडिक करणार शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राहुल, सम्राट महाडिक करणार शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

इस्लामपूर : वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीने शिवाजीराव नाईक यांच्या पक्षप्रवेशावेळी शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपचे राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी शनिवार, दि. ९ एप्रिल रोजी पेठनाक्यावर नानासाहेब महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन आणि मेळाव्याचे आयोजन केले आहे.

भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीने शक्तिप्रदर्शन केले. या चर्चेचे गुऱ्हाळ संपण्याअगोदरच भाजपचे नेते, जिल्हा बॅँकेचे संचालक राहुल महाडिक आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी पेठ नाक्यावरील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलनातील आवारात नानासाहेब महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, शनिवारी दुपारी दोन वाजता निश्चित केल्याची माहिती महाडिक बंधूंनी पत्रकार परिषदेत दिली.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विनय कोरे, संजयकाका पाटील, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, अतुल भोसले, वैभव नायकवडी, सदाभाऊ खोत, सुरेश हाळवणकर आदींसह भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांचे स्वागत माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई महाडिक करणार आहेत.

नाईक यांना प्रत्युत्तर देणार

शिराळा येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिवाजीराव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पेठनाक्यावरील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा चर्चेचा ठरणार आहे.

Web Title: Rahul, Samrat Mahadik will demonstrate in NCP stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.