सोने तस्करी प्रकरणी आटपाडी तालुक्यात छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 02:28 PM2020-09-01T14:28:11+5:302020-09-01T14:42:38+5:30
नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावर सोन्याची तस्करी करताना ताब्यात घेण्यात आलेले आठ जण सांगली जिल्ह्यातील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. आठही जण आटपाडी तालुक्यातील असल्याने सोमवारी रात्री सीमाशुल्क विभाग केंद्र जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक्यात छापे टाकले.
सांगली : नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावर सोन्याची तस्करी करताना ताब्यात घेण्यात आलेले आठ जण सांगली जिल्ह्यातील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
आठही जण आटपाडी तालुक्यातील असल्याने सोमवारी रात्री सीमाशुल्क विभाग केंद्र जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक्यात छापे टाकले.
शुक्रवारी नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावरून आठ जणांकडून ४३ कोटी रुपयांची ८० किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते सर्वजण आटपाडी तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पथकाने सोमवारी रात्री उशिरा छापे टाकून महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.
यापूर्वी सुद्धा याच मार्गाने सोन्याची तस्करी झाल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. नेहमी त्या मार्गाने सोन्याची तस्करी करत असावेत असा महसूल गुप्तचर संस्थेने अधिकाऱ्यांना संशय आहे.
पथकातील अधिकाऱ्याकडून याबाबत अधिक माहिती मिळू शकली नसली तरी महत्वाची कागदपत्र त्यांच्या हाती लागल्याचे वृत असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधात यंत्रणा आहे.