सांगलीत प्लास्टिक साहित्य विक्रेत्यावर छापे, सहा दुकानदारांकडून दंड वसूल

By शीतल पाटील | Published: June 20, 2023 07:40 PM2023-06-20T19:40:40+5:302023-06-20T19:41:07+5:30

महापालिका व प्रदुषण मंडळाची कारवाई  

Raids on plastic material seller in Sangli, fine collected from six shopkeepers | सांगलीत प्लास्टिक साहित्य विक्रेत्यावर छापे, सहा दुकानदारांकडून दंड वसूल

सांगलीत प्लास्टिक साहित्य विक्रेत्यावर छापे, सहा दुकानदारांकडून दंड वसूल

googlenewsNext

सांगली : महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सांगली, मिरज व कुपवाड शहरात सिंगल युज प्लास्टिक विक्रेत्यावर छापेमारी केली. सांगलीतील गणपती पेठ, वखारभाग परिसरासह प्रमुख बाजारपेठेतील सहा दुकानदारांवर कारवाई करीत ३० हजार तर मिरजेत २० हजाराचा दंड वसूल केला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी रवी मातकर आणि महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत सहा आस्थापनांमध्ये शासनाने बंदी घातलेले प्लास्टिक विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. प्रत्येक आस्थापनेला पाच हजार रुपयाप्रमाणे ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ३० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त केले. कारवाई केलेल्यात एम.के. प्लास्टिक, दुर्गा प्लास्टिक, मोना प्लास्टिक, आरती डिस्पोजल, आर. आर. विभुते, जी. एम. मेडिकलचा समावेश आहे.

कुपवाड शहरात फळ, फुले आणि भाजीविक्रेत्यांवर कारवाई करीत प्रत्येकी १०० रुपये दंड करण्यात आला. तर मिरजेत विक्रेत्यांकडून २० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईमध्ये वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणील माने, राजू कांबळे, कोमल कुदळे, अंजली कुदळे, पंकज गोंधळे, वैभव कुदळे, किशोर कांबळे, उत्कर्ष होवाळे यांनी भाग घेतला.

Web Title: Raids on plastic material seller in Sangli, fine collected from six shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.