रेल्वेचे आरक्षण मेअखेर फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:26 PM2019-04-05T16:26:12+5:302019-04-05T16:28:22+5:30
उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सर्वच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे तिकीट एजंट तेजीत असून जयसिंगपूर स्थानकात
मिरज : उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सर्वच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे तिकीट एजंट तेजीत असून जयसिंगपूर स्थानकात तात्काळ तिकिटे आरक्षित करणाºया दोन एजंटांना पकडण्यात आले. मात्र रेल्वे सुरक्षा दलाकडून या कारवाईची नोंद झालेली नाही.
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे आरक्षण संपल्याने तात्काळ तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची दररोज रेल्वे स्थानकात गर्दी आहे. त्यामुळे तात्काळ आरक्षित तिकिटे काढून देण्यासाठी तिकीट एजंटांच्या मध्यरात्रीपासूनच तिकीट खिडकीवर रांगा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकिटे मिळणे अशक्य बनले आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून अधुनमधून तिकीट एजंटांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मिरज स्थानकात महिन्याभरापूर्वी तिकिटाच्या रांगेत थांबण्यावरून तिकीट एजंट व एका प्रवाशाची आरक्षण कक्षातच हाणामारी झाली होती. दोन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे तात्काळ तिकीट आरक्षित करणाºया दोन एजंटांना रेल्वे सुरक्षा दलाने पकडले. मात्र या एजंटांवर कारवाई न करता, तडजोड करण्यात आल्याची चर्चा आहे. मिरजेसह अन्य रेल्वे स्थानकात अवैध तिकीट एजंट सक्रिय असून यामुळे प्रवाशांना तात्काळ तिकिटासाठी जादा भुर्दंड पडत आहे.
एजंटांवर कठोर कारवाईची प्रवासी संघटनांची मागणी आहे. मिरज-कोल्हापूर, मिरज-लोंढा रेल्वे मार्गावर विद्युतीकरण व दुहेरीकरणाची कामे सुरू असल्याने काही पॅसेंजर गाड्यांच्या फेºया रद्द झाल्याने एक्स्प्रेस गाड्यांना मोठी गर्दी आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचा फार्स करण्यात येत असल्याने अनधिकृत तिकीट एजंटांचे फावले आहे.
या गाड्यांचा समावेश...
मिरज-पुणे रेल्वे मार्गावर धावणाºया महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्यांचे आरक्षण जवळपास चार महिने अगोदरच फुल्ल झाले आहे, तर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या उत्तर भारतात धावणाºया यशवंतपूर-जोधपूर एक्स्प्रेस, गोवा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, सुवर्णजयंती एक्स्प्रेस, संपर्कक्रांती एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचे देखील आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच दक्षिणेत धावणाºया यशवंतपूर, तिरुचिरापल्ली या एक्स्प्रेस गाड्यांचेही आरक्षण संपले आहे.