रेल्वेचे खासगीकरण नको, देशभरातील स्टेशन मास्तर ३१ मे रोजी सामूहिक रजेवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 02:09 PM2022-05-24T14:09:09+5:302022-05-24T14:22:22+5:30

स्थानकांतील प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता

Railway station masters across the country will go on collective leave on the 31st | रेल्वेचे खासगीकरण नको, देशभरातील स्टेशन मास्तर ३१ मे रोजी सामूहिक रजेवर जाणार

रेल्वेचे खासगीकरण नको, देशभरातील स्टेशन मास्तर ३१ मे रोजी सामूहिक रजेवर जाणार

googlenewsNext

सांगली : विविध मागण्यांकडे रेल्वे बोर्ड आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील ३८ हजार रेल्वे स्टेशन मास्तर मंगळवारी (दि. ३१) एक दिवसाच्या सामूहिक रजेवर जाणार आहेत. यामुळे स्थानकांतील प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.

रेल्वेचे खासगीकरण करू नये, स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, तणाव भत्ता लागू करावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन केले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून याच कारणांसाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलने सुरू आहेत. २० ते २६ ऑक्टोबरदरम्यान काळ्या फिती लावून काम केले होते.

३१ ऑक्टोबररोजी एक दिवस उपाशी राहून काम केले होते. त्यानंतर एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. तरीही रेल्वे बोर्ड आणि केंद्र शासनाने मागण्यांकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता ३१ मेरोजी सामूहिक रजा आंदोलन केले जाणार आहे. पुणे विभागात ३८० स्टेशन मास्तर व सहाय्यक स्टेशन मास्तर आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मागण्या अशा...

  • स्टेशन मास्तरांना सुरक्षा व तणाव भत्ता मिळावा
  • रिक्त जागा त्वरित भराव्यात
  • रात्रपाळीच्या भत्त्याचा ४३ हजार ६०० रुपयांच्या मर्यादेचा निर्णय मागे घ्यावा
     

असोसिएशनसोबत चर्चा सुरू

१९९७ मध्ये स्टेशन मास्तरांनी सामूहिक रजा घेतल्याने देशभरात रेल्वेची चाके थांबली होती. मुंबईत हिंसक प्रवाशांनी लोकल जाळल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि स्टेशन मास्तरांनी सामूहिक रजा घेऊ नये यासाठी रेल्वे बोर्डाच्या हालचाली सुरू आहेत. स्टेशन मास्तर असोसिएशनसोबत चर्चा सुरू आहेत.

Web Title: Railway station masters across the country will go on collective leave on the 31st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.