विजयनगर, शेडबाळ, उगार स्थानकांत रेल्वेचे थांबे आठवडाभरासाठी रद्द; प्रवाशांची गैरसोय होणार

By संतोष भिसे | Published: June 13, 2023 04:43 PM2023-06-13T16:43:22+5:302023-06-13T16:43:35+5:30

मिरज : कर्नाटकात प्रवास करणाऱ्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांचे विजयनगर, शेडबाळ व उगार स्थानकांतील थांबे २० जूनपर्यंत रद्द करण्यात ...

Railway stops at Vijayanagar, Shedbal, Ugar stations are canceled for a week | विजयनगर, शेडबाळ, उगार स्थानकांत रेल्वेचे थांबे आठवडाभरासाठी रद्द; प्रवाशांची गैरसोय होणार

विजयनगर, शेडबाळ, उगार स्थानकांत रेल्वेचे थांबे आठवडाभरासाठी रद्द; प्रवाशांची गैरसोय होणार

googlenewsNext

मिरज : कर्नाटकात प्रवास करणाऱ्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांचे विजयनगर, शेडबाळ व उगार स्थानकांतील थांबे २० जूनपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. स्थानकांच्या दुरुस्ती कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील विजयनगर, शेडबाळ व उगार स्थानकांत फलाटांची उंची वाढविण्यासह अन्य कामे केली जात आहेत. त्यामुळे मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या व कर्नाटकातून मिरजेकडे येणाऱ्या १० एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. 

मिरज-हुबळी, लोंढा-मिरज, मिरज-कॅसरलाॅक, हुबळी-मिरज, मिरज-लोंढा, कॅसरलाॅक-मिरज या पॅसेंजर गाड्या थांबणार नाहीत. बेंगळूरू-मिरज राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, तिरूपती-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरूपती हरिप्रिया एक्स्प्रेस, मिरज-बेंगळूरू राणी चन्नम्मा एक्स्प्रेस या एक्सप्रेस गाड्याही थांबणार नाहीत.

Web Title: Railway stops at Vijayanagar, Shedbal, Ugar stations are canceled for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.