कडेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:40+5:302021-05-16T04:25:40+5:30
कडेगाव शहरासह तालुक्यातील कडेपूर, नेवरी, चिंचणी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कलिंगड टोमॅटोसह आंब्याच्या बागांना फटका ...
कडेगाव शहरासह तालुक्यातील कडेपूर, नेवरी, चिंचणी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कलिंगड टोमॅटोसह आंब्याच्या बागांना फटका बसला आहे. आडसाली उसाचे फड कोलमडून पडले आहेत.
तालुक्यात आठवड्यापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तालुक्याला पावसाने हुलकावणी दिली होती. शनिवारी मात्र काही वेळ पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. खरीप पिकांच्या पेरणी पूर्वमशागतीच्या कामांना व अन्य पिकांना फायदेशीर आहे.
चौकट
वीजपुरवठा पूर्ववत
शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सायंकाळी
झालेल्या पावसाने व वादळी वाऱ्यामुळे
तारा तुटून कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी
रात्रीच्या अंधारात काम करून वीजपुरवठा
पूर्ववत केला.
फोटो : कडेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेसह परिसर पावसाने झोडपून काढला.