सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागावर पावसाची अवकृपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:28 PM2018-07-29T23:28:38+5:302018-07-29T23:28:42+5:30
Next
<p>अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी तालुक्यावर पावसाची सर्वात जास्त अवकृपा झाल्याचे दिसत आहे.
चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातही यंदा गतवर्षाच्या तुलनेत कमी पाऊस नोंदला गेला आहे. ग्रामीण भाग व दुष्काळी भागाला सर्वाधिक पावसाची गरज असताना त्याठिकाणी पावसाने अपेक्षाभंग केला आहे. गतवर्षी मान्सूनपूर्व पावसाने दुष्काळी भागास मोठा दिलासा दिला होता. यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, तरीही ती पुरेशी ठरली नाही. आटपाडी तालुक्याला सर्वाधिक फटका यंदाच्या पावसाळ््यात बसला. गतवर्षी ३० जुलैपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता यंदा ७९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. त्याखालोखाल जत तालुक्याची स्थिती आहे. याठिकाणी ४९ टक्के कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही गतवर्षीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. तासगावमध्ये ७ टक्के कमी, तर वाळवा तालुक्यात १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली, मिरज, तासगावचा काही भाग पावसाकरिता पोषक म्हणून ओळखले जातात. तरीही गतवर्षीच्या तुलनेत वाळवा, तासगाव या भागात कमी पाऊस झाला आहे. केवळ पलूस, शिराळा, मिरज, विटा, कडेगाव या तालुक्यातच गतवर्षीपेक्षा चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. तुलनेत सर्वाधिक पावसाची नोंद विटा म्हणजेच खानापूर तालुक्यात झाली आहे. गतवर्षीपेक्षा ७१ टक्के अधिक पाऊस याठिकाणी नोंदला गेला. शिराळा तालुक्यात ६८ टक्के, कडेगाव तालुक्यात ६४ टक्के, मिरज तालुक्यात ६० टक्के व पलूसमध्ये ५२ टक्के गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस दिसून येत आहे. सांगली शहर व परिसरात गतवर्षीपेक्षा ५७ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा निम्म्या जिल्ह्यास लाभदायी, तर निम्म्या जिल्ह्यास अडचणी निर्माण करणारा ठरत आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमधील पावसाच्या भरवशावर आता यातील पाच जिल्ह्यांना रहावे लागेल. दुष्काळी भागात बºयाचदा परतीच्या पावसाची समाधानकारक हजेरी लागते. त्यामुळे परतीच्या पावसाकडेही या भागाचे लक्ष असेल.
तालुकानिहाय तुलनात्मक पाऊस
तालुका ३० जुलै ३० जुलै
२०१७ २०१८
इस्लामपूर २५७ २१५
पलूस ८६.५ १६५.३
तासगाव १२८ १२०
सांगली परिसर १५० २५९
शिराळा ३७९ ५६१
मिरज १३७ २२८
विटा १५९ २२५
आटपाडी १७३ ३७
कवठेमहांकाळ १८६ १४४
जत २६९ १३९
कडेगाव १९५ ३०६