कोकरुड परिसराला अवकाळी पावसाने झोडपले, रब्बी पिकांना फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 04:20 PM2022-03-12T16:20:53+5:302022-03-12T16:29:35+5:30

कोकरुड : शिराळा तालुक्यातील कोकरुड परिसराला आज, शनिवारी सकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल  २०  मिनिट पावसाने झोडपून काढले. या पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसणार आहे. शिराळा ...

Rainfall in Kokrud area of ​​Sangli district, Rabi crops will be damaged | कोकरुड परिसराला अवकाळी पावसाने झोडपले, रब्बी पिकांना फटका बसणार

कोकरुड परिसराला अवकाळी पावसाने झोडपले, रब्बी पिकांना फटका बसणार

Next

कोकरुड : शिराळा तालुक्यातील कोकरुड परिसराला आज, शनिवारी सकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल  २०  मिनिट पावसाने झोडपून काढले. या पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसणार आहे.

शिराळा तालुक्यातीच्या पश्चिम भागात कोकरुड परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके सध्या जोमात आली आहेत. अशा  परिस्थितीत  आज सकाळी आकाशात ढगांची  दाटी झाली. विजांच्या  कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली. अचानक पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी जनावरांसाठी साठवलेला सुका चाराही भिजला आहे. 

हवामानात बदल झाल्याने हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. यानुसार काही भागात पावसाने हजेरी देखील लावली. कोकण परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. तर काल, पासून ढगाळ वातावरण होते. यातच आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा पसरला होता.

Web Title: Rainfall in Kokrud area of ​​Sangli district, Rabi crops will be damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.