सांगली शहरात पावसाची हजेरी, विक्रेत्यांची तारांबळ

By अविनाश कोळी | Published: November 4, 2023 06:07 PM2023-11-04T18:07:56+5:302023-11-04T18:08:59+5:30

खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल : ढगांची दाटी कायम

Rains in Sangli city, Damage to Retailers' Merchandise | सांगली शहरात पावसाची हजेरी, विक्रेत्यांची तारांबळ

सांगली शहरात पावसाची हजेरी, विक्रेत्यांची तारांबळ

सागली : शहर व परिसरात आज, शनिवारी दुपारी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. दिवाळीसाठी बाजार भरला असताना आलेल्या पावसाने विक्रेते व खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. किरकोळ विक्रेत्यांच्या मालाचे पावसाने नुकसान झाले.

सांगलीत सकाळपासून अंशत: ढगाळ वातावरण होते. दुपारी एक वाजता ढगांची दाटी होऊन शहराच्या उत्तर भागात म्हणजे वसंतदादा साखर कारखाना परिसरासह माधवनगरमध्ये पावसास सुरुवात झाली. त्यावेळी शहरात पावसाचा शिडकावा होता. दुपारी अडिच वाजता सांगली शहरात पावसाने हजेरी लावली. वीस मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सांगलीच्या कापडपेठ परिसरात भरलेल्या शनिवारच्या आठवडा बाजारात तसेच शिवाजी मंडईत विक्रेते व खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे रांगोळी व अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले.

सायंकाळी ढगांची दाटी कायम होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी व सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. या काळात तापमानात अंशत: वाढ होईल. शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके होते.

Web Title: Rains in Sangli city, Damage to Retailers' Merchandise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.