शामरावनगरला पावसाळी पाणी निचऱ्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:04+5:302021-05-15T04:26:04+5:30

सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. अनेक वर्षांपासूनच्या या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नैसर्गिक उताराने पाणी निचरा ...

Rainwater drainage work started in Shamravanagar | शामरावनगरला पावसाळी पाणी निचऱ्याचे काम सुरू

शामरावनगरला पावसाळी पाणी निचऱ्याचे काम सुरू

Next

सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. अनेक वर्षांपासूनच्या या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नैसर्गिक उताराने पाणी निचरा करण्यासाठी महापालिकेने काम हाती घेतले आहे.

शहरातील शामरावनगर परिसरात पावसाळ्यात प्रचंड दलदल निर्माण होते. पाण्याचा नैसर्गिकरित्या निचरा होत नसल्याने दरवर्षी शामरावनगमधील नागरिकांना

नरकयातना भोगाव्या लागतात. रस्ते खराब होतात. नागरिकांना दळणवळण करण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. पाणी साचून राहिल्याने डासांचे

प्रमाण वाढते. परिणामी साथीचे रोग पसरतात. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले यांनी या परिसरातील पाण्याचा

निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

पावसाळ्यात शामरावनगरमध्ये साचून राहणारे पाणी नैसर्गिक उताराने बाहेर काढण्याचे काम महापालिकेमार्फत सुरू करण्यात आले आहे. शामराव नगर, खिलारे

मंगल कार्यालय, कालिका मंदिर परिसर, उदय हॉटेल परिसर, श्रीराम कॉलनी, झुलेलाल मंदिर परिसरात असमतल मार्गामुळे पाणी साचून रहात होते. या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Rainwater drainage work started in Shamravanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.