रिमझिम गाण्यांची सुरमयी बरसात

By Admin | Published: August 2, 2016 12:17 AM2016-08-02T00:17:56+5:302016-08-02T01:00:44+5:30

सखी झाल्या चिंब : कलर्स प्रस्तुत, सखी मंच आयोजित कार्यक्रम; नृत्य स्पर्धेचीही रंगतरिमझिम गाण्यांची सुरमयी बरसात सखी झाल्या चिंब : कलर्स प्रस्तुत, सखी मंच आयोजित कार्यक्रम; नृत्य स्पर्धेचीही रंगत

Rainy Rain Rainy Songs | रिमझिम गाण्यांची सुरमयी बरसात

रिमझिम गाण्यांची सुरमयी बरसात

googlenewsNext

सांगली : बाहेर ऊन-पावसाचा खेळ आणि सभागृहात पाऊस गाण्यांचा कोसळणाऱ्या धारांमध्ये सखी चिंब झाल्या. निमित्त होते कलर्स प्रस्तुत 'सखी मंच'च्यावतीने आयोजित ‘रिमझिम गाणी-झलक सुहानी’ कार्यक्रमाचे.
विष्णुदास भावे नाट्यगृहात शनिवारी सखींच्या भरगच्च गर्दीत हा कार्यक्रम बहरला. जुन्या व नव्या प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील गाणी 'आॅर्केस्ट्रा हिटस बिटस्चे प्रल्हाद पाटील यांच्यासह फैजल पटेल, भक्ती साळुंखे यांनी सादर केली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे उद््घाटन उद्योजिका आशा जैन यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाची सुरुवात सुरेश वाडकर व लता मंगेशकर यांच्या ‘मेघा रे मेघा रे..’ या गीताने झाली. त्यानंतर ‘मोहब्बत बरसा देना तू..’, ‘बाहो में चले आ..’, ‘जिंदगी प्यार का गीत हैं..’, ‘चिंब पावसाने रान झालं..’, अशी एकाहून एक सुरेख गीते सादर करण्यात आली. या पाऊस गाण्यांनी सभागृहातही जणू उत्साहाच्या पावसाची बरसात झाली. या गीतांवर सखींनी नृत्याचा आनंद लुटला. यावेळी झालेल्या नृत्य स्पर्धेस परीक्षक म्हणून टीना मूग, कंचन साधवानी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)


‘झलक दिखला जा’ नृत्य स्पर्धा
कलर्स प्रस्तुत सखी मंच 'रिमझिम गाणी; झलक सुहानी' या कार्यक्रमात कलर्स चॅनेलवर सादर करण्यात येत असलेल्या 'झलक दिखला जा हॉट है' या डान्स शोवर आधारित नृत्य स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आणली. प्रथम दहा सखींनी आपल्या नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर नृत्यांगनांचा अंतिम सामना घेण्यात आली. या स्पर्धेत जॅकलिन फर्नांडिसच्या ‘लत लग गई' या गाण्यावर सखींनी नृत्य केले. विशाखा सपकाळ, संजीवनी पाटील, प्रीती देशपांडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
'झलक दिखला जा हॉट हैं'
कलर्स चॅनेलवर शनिवारपासून रात्री १0 वाजता 'झलक दिखला जा हॉट हैं' ही स्पर्धा सुरू आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २00६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडेल जॅकलिन फर्नांडिस सेलिब्रेटी जज आहे. याशिवास सुप्रसिद्ध निर्देशक करण जोहर, कोरिओग्राफर गणेश हेगडेसुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत धमाल करणार आहेत. एकूण १२ सेलिबेट्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ज्यात सुर्विन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी (शेफ) सहेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिद्धांत गुप्ता, शांतनू माहेश्वरी असे १0 प्रख्यात सेलिब्रेटी या शोचे आकर्षण आहे, पण जॅकलिनच्या सहभागाने या शोला ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरुप आले आहे, हे या शोचे वैशिष्ट्य.

Web Title: Rainy Rain Rainy Songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.