बाजार समितीत आजपासून बेदाणा सौदे सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:25+5:302021-06-01T04:20:25+5:30
सांगली : आज, मंगळवारपासून (दि. १) बाजार समितीत बेदाणा सौदे सुरू होतील. तसेच फळ मार्केटमध्ये फळे, भाजीपाला ...
सांगली : आज, मंगळवारपासून (दि. १) बाजार समितीत बेदाणा सौदे सुरू होतील. तसेच फळ मार्केटमध्ये फळे, भाजीपाला सौदे सुरू होणार असल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यवसाय करण्याची सूचना त्यांनी केली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी सौद्यांसाठी परवानगी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदे बंद होते. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकरी, व्यापारी, दलाल, हमाल, तोलाईदारांना मोठा फटका बसला होता. सौदे सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांकडे सभापती पाटील, संजय बजाज, मैनुद्दीन बागवान, बेदाणा असोसिएशनचे राजेंद्र कुंभार, संचालक मुजीर जांभळीकर यांनी पाठपुरावा केला.
पाटील यांनी हिरवा कंदील दर्शविला. सकाळी सात ते अकरा या वेळेत नियम पाळून सौदे होतील. फळ मार्केटमध्ये फळांचे व भाजीपाला सौदेही याच वेळेत होतील.