हमाल, शेतकºयांच्या पेन्शनसाठी लढा उभारू-- बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:55 PM2017-10-10T23:55:15+5:302017-10-10T23:57:38+5:30

 Raising the fight for the pensions of Hamal, Farmers - Baba Adhav | हमाल, शेतकºयांच्या पेन्शनसाठी लढा उभारू-- बाबा आढाव

हमाल, शेतकºयांच्या पेन्शनसाठी लढा उभारू-- बाबा आढाव

Next
ठळक मुद्देसांगलीत हमाल, माथाडी कामगारांचा मेळावा; जेल भरो आंदोलनाचा इशारालोकांचे नव्हे, तर धर्माचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ल मापाडी महामंडळाचे अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी बीड येथे

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील कष्टकरी, अंगमेहनती, हमालांसोबतच आता शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारला जाणार आहे. हमाल, शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी जेल भरो आंदोलनही करू. राज्यातील सर्व तुरूंग भरल्यावर राज्यकर्त्यांना पेन्शन द्यावीच लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केले.

सांगलीत हमाल, मापाडी, हळद महिला कामगारांचा मेळावा व ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांना गाडी प्रदान समारंभ असा संयुक्त कार्यक्रम झाला, यावेळी डॉ. आढाव बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, महामंडळाचे सहचिटणीस राजकुमार घायाळ, माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ उपस्थित होते.

आढाव म्हणाले की, आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, पण कष्टकºयांना पेन्शन नाही. हमालांना पेन्शन लागू करण्याची मागणी होत आहे. आता केवळ हमालांपुरतीच लढाई हाती घेतली जाणार नाही, तर या लढ्यात शेतकरी, शेतमजुरांनाही सहभागी करून रस्त्यावरची लढाई हाती घेतली जाईल. त्यासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा. राज्यातील सर्व तुरूंग कष्टकºयांनी भरले पाहिजेत. मग पेन्शनची मागणी धुडकाविण्याची हिम्मत राज्यकर्त्यांना होणार नाही.

हमाल पंचायतीने अनेक वर्षे लढा देऊन बºयाच मागण्या मान्य करून घेतल्या. पण आता त्याच्या मुळावरच सरकार उठले आहे. जातपात, धर्म, स्त्री, पुरूष असे भेद विसरून तुम्ही एकत्र येऊन न्याय मिळविला आहे. तसाच लढा शेतकºयांनीही उभारला आहे. त्यांना केवळ कर्जमुक्ती देऊन चालणार नाही, तर शेतीमालाला हमीभाव देण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाने स्वीकारली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पतंगराव कदम म्हणाले की, सांगली बाजार समितीत हमाल, व्यापारी, संचालक मंडळात कुठलाही तंटा नाही. त्यामुळे राज्यात सांगली बाजार समितीने पहिला क्रमांक मिळविला आहे. हमालांची पेन्शनची मागणी रास्त आहे.

शेतकºयांसोबत हमालांनाही पेन्शन मिळाली पाहिजे. सरकारला धडा शिकविल्याशिवाय ते हलत नाही. त्यामुळे हा प्रश्न धसास लावण्यासाठी सर्वांनी एकत्र पुढाकार घेऊया.बापूसाहेब मगदूम म्हणाले की, वयाच्या पंधराव्या वर्षापासून कष्टकºयांच्या लढ्यात सहभागी झालो. कष्टकºयांना पेन्शन मिळाल्याशिवाय थांबणार नाही. डिसेंबरमध्ये शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी यांची एकत्रित परिषद घेणार आहोत. राजकुमार घायाळ म्हणाले की, कष्टकºयांनी लढा देऊन जे मिळविले, ते काढून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. गोवा, राजस्थान, दिल्लीत हमालांना पेन्शन दिली जाते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला. यावेळी प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, दिलीप सूर्यवंशी, प्रशांत शेजाळ, अ‍ॅड. के. डी. शिंदे यांचीही भाषणे झाली.हमाल पंचायतीचे सचिव विकास मगदूम यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, बाजार समितीचे सचिव पी. एस. पाटील, संचालक बाळासाहेब बंडगर, गोविंद सावत, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, श्रीमंत बंडगर, शालन मोकाशी, बजरंग खुटाळे, वसंत यमगर, बाबासाहेब गडदे उपस्थित होते.

लोकांचे नव्हे, धर्माचे राज्यडॉ. बाबा आढाव यांनी केंद्र व राज्य शासनावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, लाल झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही लढा दिला. आता तोच झेंडा, समाजवाद काढून टाकण्याची भाषा केली जात आहे. लाल झेंडा गेला, तर कष्टकºयांचे काहीच चालणार नाही. सध्या देशात उलटे वारे वाहू लागले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर घाव घातला जात आहे. अन्यायाविरुद्धच्या लढ्यात जात, धर्म आडवे येत आहेत. लोकांचे नव्हे, तर धर्माचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली. बीडला अधिवेशन
राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी बीड येथे होत आहे. या अधिवेशनाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पणनमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title:  Raising the fight for the pensions of Hamal, Farmers - Baba Adhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.