राजारामबापू कारखान्याच्या कर्जप्रकरणावरून खडाजंगी
By Admin | Published: July 7, 2015 01:20 AM2015-07-07T01:20:13+5:302015-07-07T01:21:04+5:30
जिल्हा बॅँक बैठक : बॅँकेला राजकीय अड्डा बनविल्याचा विशाल पाटील यांचा आरोप
सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला ४० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी जिल्हा बॅँकेच्या सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. कॉँग्रेसचे सदस्य विशाल पाटील यांनी राजारामबापू कारखान्याला नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप यावेळी केला. दुसरीकडे बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावताना, कोणतीही नियमबाह्य प्रक्रिया राबविली नसल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी दुपारी पार पडली. साडेतीन तास ही सभा सुरू होती. राजारामबापू कारखान्याच्या चार युनिटला बॅँकेने चाळीस कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने या बैठकीत विशाल पाटील यांनी सत्ताधारी गटावर हल्लाबोल केला. बॅँकेचा वापर स्वत:च्या संस्था टिकविण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजारामबापू बॅँक शॉर्ट मार्जिनमध्ये (अपुरा दुरावा) असतानाही कर्जवाटप कसे केले?, एकच संस्था असतानाही चार वेगवेगळे कारखाने दाखवून मर्यादेपेक्षा जास्त कर्जपुरवठा कोणत्या कायद्याच्या आधारे मंजूर केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिलीपतात्या पाटील यांनी कारखान्याची स्वतंत्र चार
मर्यादेपेक्षा जादा कर्ज
विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एखाद्या संस्थेला कर्जपुरवठा करताना १२७ कोटीची मर्यादा असताना, राजारामबापू कारखान्यास २९२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. अपुरा दुरावा असतानाही कारखान्याच्या चारही युनिटना प्रत्येकी १0 कोटी रुपयांप्रमाणे ४0 कोटी रुपये तात्पुरते कर्ज देण्यात आले आहे. बँकेच्या माध्यमातून स्वत:च्या संस्थांचा फायदा केला जात आहे. चार वेगवेगळी युनिट असली तरी, राजारामबापू सहकारी साखर कारखाना ही एकच संस्था आहे. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतंत्र युनिट म्हणून पाहताच येत नाही. तरीही नियमबाह्य कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
समित्यांवरूनही नाराजी
कार्यकारी समिती, लेखापरीक्षण समिती नियुक्त करण्यावरूनही काही
सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. समिती सदस्यत्वासाठी नेमके काय निकष लावण्यात आले, असा सवाल प्रताप पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर या समित्यांमध्ये चार महिन्यांनी बदल होत असतो. त्यामुळे पुढील काळात प्रत्येकालाच संधी मिळू शकते, असे स्पष्टीकरण दिलीपतात्या पाटील यांनी दिले.