राजाराम सॉल्व्हेक्सने महिलांना आर्थिक ताकद दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:55+5:302020-12-22T04:25:55+5:30
इस्लामपूर : राजाराम सॉल्व्हेक्सने वाळवा तालुक्यातील महिला बचत गटांना राजधारा तेलाच्या विक्रीची संधी देत तालुक्यातील महिला बचत गटांना आर्थिक ...
इस्लामपूर : राजाराम सॉल्व्हेक्सने वाळवा तालुक्यातील महिला बचत गटांना राजधारा तेलाच्या विक्रीची संधी देत तालुक्यातील महिला बचत गटांना आर्थिक ताकद देण्याचा स्तुत्य उपक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे. या संस्थेच्या सभासदांना २० टक्के लाभांश देण्याची घोषणा युवा नेते राजवर्धन पाटील यांनी केली.
राजाराम सॉल्व्हेक्सच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी राजाराम सॉल्व्हेक्सचे उपाध्यक्ष विकास कर्डीले, संचालक सुरेश सावंत, आनंदराव काकडे, राजाराम बायो एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल कर्डीले उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राजाराम सॉल्व्हेक्सने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची निर्मिती करीत देश पातळीवरील बाजारपेठेत यशस्वी पदार्पण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बी-बियाणे, तणनाशके, कीटकनाशके, आदींचा पुरवठा केला आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढविली जाणार आहे. नेताजीराव पाटील म्हणाले, आपल्या परिसरातील शेतकरी उसाबरोबर सोयाबीनचे मोठे उत्पादन घेत असून, त्यांच्या सोयाबीनला राजाराम सॉल्व्हेक्सने हमखास बाजारपेठ मिळवून दिली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सॉल्व्हेक्सचे अध्यक्ष भगतसिंह पाटील, संचालक माणिकआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे. विकास कर्डीले यांनी स्वागत व प्रास्ताविकात गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने ३४३ कोटींची तेल विक्री केली आहे. त्यातून ११ कोटी २९ लाख रुपये इतका करपूर्व नफा झाला आहे. यावर्षी २७ टक्के नफ्यात वाढ झाल्याचे स्पष्ट केले.
यावेळी वित्त व्यवस्थापक संजय पाडळकर, उपसरव्यवस्थापक रमेश गायकवाड, दीपक पाटील, एस. आर. एकुंडे यांच्यासह सभासद उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी- २११२२०२०-आयएसएएम-राजाराम सॉल्व्हेक्स न्यूज
इस्लामपूर येथील राजाराम सॉल्व्हेक्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नेताजीराव पाटील, विकास कर्डीले, सुरेश सावंत, आनंदराव काकडे, स्वप्निल कर्डीले उपस्थित होते.