केंद्रीय जीएसटी सहायक आयुक्तपदी राजकुमार के.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:21+5:302021-05-06T04:28:21+5:30

मिरज : केंद्रीय जीएसटी सांगली विभागाच्या सहायक आयुक्तपदी भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राजकुमार के. यांची नियुक्ती झाली ...

Rajkumar K as Central GST Assistant Commissioner. | केंद्रीय जीएसटी सहायक आयुक्तपदी राजकुमार के.

केंद्रीय जीएसटी सहायक आयुक्तपदी राजकुमार के.

Next

मिरज : केंद्रीय जीएसटी सांगली विभागाच्या सहायक आयुक्तपदी भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राजकुमार के. यांची नियुक्ती झाली आहे. सहायक आयुक्त किशोर गोहिल यांच्याकडून राजकुमार यांनी कार्यभार स्वीकारला.

मूळचे तेलंगणा येथील राजकुमार के. यांनी आयआयटी, पवई येथून पदवी संपादन केली. २०१९ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर (जीएसटी) व सीमा शुल्क विभागात निवड झाली. सांगली जीएसटी कार्यालयात यापूर्वीचे सांगलीचे सहायक आयुक्त किशोर गोहिल यांना निरोप व राजकुमार के. यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त मोहन वाघ, अधीक्षक रवींद्र कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, निवेन तेलंग, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर उपस्थित होते.

Web Title: Rajkumar K as Central GST Assistant Commissioner.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.