राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा साखर विकत घ्यावी-सुभाष देशमुख यांची खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 09:50 PM2019-01-25T21:50:42+5:302019-01-25T21:52:29+5:30

एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली

 Raju Shetty should buy sugar instead of agitation - Subhash Deshmukh's hunchback criticism | राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा साखर विकत घ्यावी-सुभाष देशमुख यांची खोचक टीका

राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा साखर विकत घ्यावी-सुभाष देशमुख यांची खोचक टीका

Next
ठळक मुद्देकारखानदारांचा फॉर्म्युला ‘स्वाभिमानी’ला मान्य नसल्यामुळेच उसाची बिले लांबली

सांगली : एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी, अशी खोचक टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेट्टी यांच्यावर शुक्रवारी सांगलीत केली. कारखानदारांना मी तसे आवाहन केल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ उलटला तरी शेतकºयांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. कारखानदारांनी काढलेला ७०:३० हा फॉर्म्युला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. संघटनेने एकरकमी एफआरपीसाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे, आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. यावर पत्रकारांनी सहकारमंत्री देशमुख यांना विचारले असता ते बोलत होते. त्यांच्याहस्ते सांगलीमध्ये महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन झाले.

ते पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर शिल्लक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राजू शेट्टींनी मध्यंतरी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकºयांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी. राज्यातील साखर कारखानदारांना आवाहन करतो की, त्यांनी राजू शेट्टी यांना साखर विकत द्यावी आणि एफआरपीचा तोडगा काढावा. शेतकºयांना वेळेत उसाची बिले मिळावीत, हीच सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने अधिकाºयांशी माझी सारखी चर्चा सुरु आहे. साखर कारखानदारांशी चर्चा केली असता, ते साखरेला दर नसल्याचे सांगत आहेत. शासनाकडून काही मदत करुन एफआरपीची रक्कम देण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत, असेही सुभाष देशमुख म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शेट्टी म्हणत आहेत की सहकार मंत्र्यांच्याच कारखान्याची एफआरपी थकीत आहे. पण शेतकºयांना १०० टक्के एफआरपीची रक्कम मिळणार आहे हे निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भाजप-सेना युती होणारच
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची युती होणारच आहे, त्यात काही शंका नाही. काही नेत्यांचे मतभेद हे होत असतात. यावर मार्ग काढून नेत्यांचे मतभेद मिटवून तोडगा काढून युती होईलच, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

 

Web Title:  Raju Shetty should buy sugar instead of agitation - Subhash Deshmukh's hunchback criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.