Raju Shetty: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 09:37 PM2022-07-16T21:37:27+5:302022-07-16T21:45:19+5:30

महेश खराडे: मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जदारास ५० हजार देण्याचे आश्वासन

Raju Shetty: Tomorrow's march of 'Swabhimani' in Sangli has been postponed, Says Raju Shetty on Eknath Shinde | Raju Shetty: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित

Raju Shetty: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित

Next

अशोक डोंबाळे/सांगली 

सांगली : येत्या कॅबिनेट बैठकिमध्ये सरसकट सर्व नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देऊ, कोणतेही निकष लावणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ ‌शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली आहे. त्यामुळे सोमवार १८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. 

महेश खराडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ते देताना त्यांनी जे निकष लावले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळला नाही. याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले होतो. सोमवारी सांगलीत मोर्चा होता. त्यापूर्वीच शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीचर्चेसाठी मुबईला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार राजू शेट्टी, प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिषटमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी दोघांनीही सरसकट अनुदान देवू कोणतेही निकष लावणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. हे सर्व निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे. त्यामुळे जुलै रोजी होणारे मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास ऑगस्ट या क्रातीदिनी पेठ नाका येथे राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

Web Title: Raju Shetty: Tomorrow's march of 'Swabhimani' in Sangli has been postponed, Says Raju Shetty on Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.