निलेवाडीत रमले ४५ वर्षांपूर्वीचे शालेय सवंगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:50+5:302021-01-15T04:21:50+5:30

वशी : निलेवाडी (ता. हातकणंगले) हे वारणा काठचे एक निसर्गरम्य गाव ‘स्वच्छ भारत’ योजनेत आघाडीवर आहे. या गावच्या ...

Ramle played in Nilewadi 45 years ago | निलेवाडीत रमले ४५ वर्षांपूर्वीचे शालेय सवंगडी

निलेवाडीत रमले ४५ वर्षांपूर्वीचे शालेय सवंगडी

googlenewsNext

वशी : निलेवाडी (ता. हातकणंगले) हे वारणा काठचे एक निसर्गरम्य गाव ‘स्वच्छ भारत’ योजनेत आघाडीवर आहे. या गावच्या विद्यामंदिरात त्या गावचे सरपंच भापकर व शाळेचे माजी मुख्याध्यापक बबन टोपुगडे यांच्या पुढाकाराने एक सोहळा उत्साहात झाला. निमित्त होते तब्बल ४५ वर्षांनंतर एकत्र आलेले वर्गमित्र आणि त्यांचे स्नेहसंमेलन.

शिवराज विद्यालय ऐतवडे खुर्द या शाळेतील १९७५ एसएससीच्या तुकडीतील हे विद्यार्थी निलेवाडीत जमले. बबन टोपुगडे हे याच वर्गात होते. निलेवाडीच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून शेवटची १४ वर्षे ज्ञानसेवेत घालविल्यानंतर ते निवृत्त झाले. शाळेची अत्यंत देखणी इमारत आणि तिला आणखी सजविण्यासाठी समोर ओळीने उभे असलेले पामवृक्ष, दर्शनीच स्वागताला उभी असलेली देवी सरस्वती आणि गर्द झाडीचे उंच कुंपण अशा या ज्ञानमंदिरात हा सोहळा साजरा करण्याकरिता शिवराजचे ते जुने विद्यार्थी जमा झाले.

४५ वर्षे म्हणजे जवळ जवळ अर्धे शतक एकमेकांशी दुरावलेल्या या वर्गमित्रांनी भेट झाली. त्यावेळचे त्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा उपस्थित होते. जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या हृदयातील भावभावनांना वाट करून देताना पापण्यांना चकवून अश्रू धारा गालावर उतरून पिकल्या मिशात कधी मिसळल्या हे कळलेच नाही.

डी. ए. वळीव हे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३७ वर्षे सेवेत होते. राजाराम जाधव (उपासे) पोलीस खात्यात अधिकारी, हंबीरराव मोहिते जि. प. शाळेत मुख्याध्यापक, जाधव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, काही प्रगतिशील शेतकरी, काही दुकानदार असे सगळेच आपल्या हरवलेल्या बालपणाला शोधत होते. त्यांचे त्यावेळचे हेडमास्तर व्ही. आर. भोसले, मराठीचे शिक्षक एम. बी. पाटील. पूर्वीचे हेडमास्तर ए. पी. पवार, लगारे, शिवाजी पाटील, येवले आणि त्यांचे लाडके शिपाई मामा हणमंत खोत. एकमेकांना भेटून जितके हरकले होते तितकेच महिपा मामा, व्ही.डी .पाटील, एम. ए. पाटील यांच्या देवाघरी जाण्यामुळे अत्यंत दु:खी-कष्टी झाले होते.

फोटो - १३०१२०२१-आयएसएलएम-वशी न्यूज

Web Title: Ramle played in Nilewadi 45 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.