‘रंग मराठी मातीचा...’ला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: July 3, 2015 11:56 PM2015-07-03T23:56:31+5:302015-07-04T00:01:10+5:30
नमन, ओवी, भूपाळी, शेतकरी गीत, कोळीगीत, दिंडी, सासनकाठी, पिंगळा, बहुरुपी, माऊली, वाघ्या मुरळी, कडक लक्ष्मी व भव्य शिव राज्याभिषेक सोहळा सादर करून एक्कावन्न कलाकारांनी सखींना भारावून टाकले.
सांगली : सांगलीतील भावे नाट्यमंदिरात ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित व रामभाऊ मासाळ निर्मित ‘रंग मराठी मातीचा जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमास सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे आकर्षक नेपथ्य, ढंगदार लोककला, गीते, नृत्ये आणि संवादातून सादरीकरण, ५० वर्षांपूर्वीचे ग्रामीण भागाचे हुबेहूब चित्र सादर केले व भव्य-दिव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला. या सर्वच कार्यक्रमांनी सखींना मंत्रमुग्ध केले.
नमन, ओवी, भूपाळी, शेतकरी गीत, कोळीगीत, दिंडी, सासनकाठी, पिंगळा, बहुरुपी, माऊली, वाघ्या मुरळी, कडक लक्ष्मी व भव्य शिव राज्याभिषेक सोहळा सादर करून एक्कावन्न कलाकारांनी सखींना भारावून टाकले.
या कार्यक्रमाचे निर्माते काका मोरे, संजय मोहिते असून लेखक, दिग्दर्शक अशोक अपराध, राजू शिंदे, संदीप गावडे आहेत. नृत्य दिग्दर्शन सूरज वाघमोडे (फ्युजन अॅकॅडमी, माधवनगर) यांनी, तर निवेदन प्रा. संतोष जाधव यांनी केले. वेशभूषेची जबाबदारी अनुजा नाट्य विश्व यांनी, तर रंगभूषेची जबाबदारी राजू मोहिते, प्रशांत मोहिते यांनी सांभाळली. नृत्ये सचिन कापसे, सागर हराळे, विकास गुरव, महेश घुणके, प्रशांत माळेकर, सुनील अडसुळे, किरण मोहिते, सादिक, रूद्र माळी, विजय मोहिते, विजय घाटगे, नियाज यांनी सादर केली. ध्वनी व लाईटची व्यवस्था रवी परीट, नागेश चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)