कडक उन्हामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट, सांगली जिल्ह्यात १० पाझर तलाव पडले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:22 IST2025-02-27T15:20:26+5:302025-02-27T15:22:15+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे जलाशयातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. यामुळे ४९ पैकी १० पाझर तलाव ...

Rapid decline in water storage due to hot summer 10 lakes have dried up In Sangli district | कडक उन्हामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट, सांगली जिल्ह्यात १० पाझर तलाव पडले कोरडे

छाया : विकास शहा

शिराळा : शिराळा तालुक्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे जलाशयातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. यामुळे ४९ पैकी १० पाझर तलाव कोरडे पडले आहेत; त्यामुळे या परिसरातील जनावरांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

करमाळे नंबर १ व पाचुंब्री तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ४७ तलावांपैकी हत्तेगाव येथील तलावात ९५ टक्के पाणीसाठा असून, १० तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. २ तलावांत ९०, एका तलावात ८५, तर ३ तलावांत ५० टक्के पाणीसाठा आहे.

उन्हाची दाहकता वाढू लागल्याने धरण, विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. मार्चअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीपातळी घटणार असून पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे.

तलावाचे नाव व कंसात पाणीसाठा : टक्केवारी अशी

हत्तेगाव (९५), प.त. शिराळा नंबर १, पाडळी (९०), खिरवडे (८५), भटवाडी, वाडीभागाई बिऊर (७५), वाकुर्डे बुद्रुक जमदाड कुरण, बादेवादी वाकुर्डे बुद्रुक, अंत्री खुर्द, निगडी महारदरा, कापरी, तडवळे नंबर १ (७० ), गवळेवाडी उंदीर खोरा, गवळेवाडी बहिरखोरा, वाकुर्डे खुर्द, पाडळेवाडी (६५), औंढी (५५ ),शिरसटवाडी, खेड, रेड क्रमांक २ (५०), मेणी (सांकृबी नाला, बेलदारवाडी, तडवळे वाडदरा (४५), येळापूर (चव्हाणवाडी), करमाळे नंबर २ (४०), आटुगडेवाडी (मेणी), धामवडे (कुंडनाला), लादेवाडी (३५), कोंडाईवाडी नंबर १ व २, शिरशी (कासारकी), प. त. शिराळा, नंबर २,पावलेवाडी नंबर १ व २ (२५), पाचुंब्री (२०), चरणवाडी नंबर १, भाटशिरगाव (१५).

कोरडे पडलेले पाझर तलाव

सावंतवाडी, शिरशी नंबर १, शिरशी भैरवदरा आणि काळेखिंड, शिवरवाडी, भैरेवाडी, निगडी जुना कासारदरा, निगडी खोखडदरा, करमाळा नंबर १, इंगरूळ हे दहा तलाव कोरडे पडले आहेत.

तापमानवाढीस वातावरणातील बदल कारणीभूत आहेत. त्यामुळे अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात जलाशयातील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावातील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. परिणामी पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. - प्रवीण तेली, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शिराळा

Web Title: Rapid decline in water storage due to hot summer 10 lakes have dried up In Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.