कुपवाडमध्ये आढळला दुर्मिळ पोवळा जातीचा साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:40 PM2020-11-18T20:40:21+5:302020-11-18T20:41:21+5:30
snake, wildlife, forestdepartment, sangli कुपवाड येथील तराळ गल्लीत दुर्मिळ पोवळा जातीचा विषारी साप आढळून आला. हा साप मानवी वस्तीत आढळत नाही. तरीही तो कुपवाडमध्ये नागरी वस्तीत आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले.
सांगली : कुपवाड येथील तराळ गल्लीत दुर्मिळ पोवळा जातीचा विषारी साप आढळून आला. हा साप मानवी वस्तीत आढळत नाही. तरीही तो कुपवाडमध्ये नागरी वस्तीत आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले.
आयुष सेवाभावी संस्थेचे सर्पमित्र गणेश आनंदे यांना कुपवाड येथे तराळ गल्लीत विषारी साप आढळला. हा साप जाडीने कमी, रंग फिकट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा व शेपटीवर दोन काळे कडे असा होता. आनंदे यांनी हा साप पकडून तो बाटतील बंद केला. त्याचा फोटो सर्पमित्र अजित काशीद यांना पाठविला असता, हा साप दुर्मिळ पोवळा जातीचा असल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी त्याचा अधिवास आहे. या सापाला हिंदीत काला धारी मुंगा, इंग्रजीत कोरल स्नेक, तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलीऑपीस मेलानुरस म्हटले जाते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे त्याने दंश केल्याच्या घटना आढळत नाहीत.यावेळी सोहेल काजी, सागर चिंचकर, रुद्रप्रताप कारंडे, सोहेब मुजावर, चिंतामणी पवार, सिद्धार्थ यादव उपस्थित होते.