राष्टÑवादीला आव्हान रयत विकास आघाडीचे-- वाळवा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 10:57 PM2017-09-07T22:57:08+5:302017-09-07T22:59:09+5:30

इस्लामपूर : राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदा पहिल्यांदाच तुंबळ धुमशान होण्याची चिन्हे आहेत.

 Rashtra Vikas Alliance - Desert Taluka | राष्टÑवादीला आव्हान रयत विकास आघाडीचे-- वाळवा तालुका

राष्टÑवादीला आव्हान रयत विकास आघाडीचे-- वाळवा तालुका

Next
ठळक मुद्देयंदा प्रथमच तुंबळ धुमशानाची शक्यता; दिग्गजांची राजकीय प्रतिष्ठा पणाला;स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसचा कडीपत्ता कोणाला फोडणी देणार, हेसुध्दा स्पष्ट होईल.

४२ गावेच राहणार मुख्य ‘लक्ष्य’--ग्रामपंचायत निवडणूक

युनूस शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदा पहिल्यांदाच तुंबळ धुमशान होण्याची चिन्हे आहेत. बलाढ्य राष्ट्रवादीच्या विरोधात सत्तेची साथ घेत भाजप पुरस्कृत रयत विकास आघाडी उतरणार असल्यामुळे, आमदार जयंत पाटील यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, गौरव नायकवडी, वैभव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मात्र खरा फोकस इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात येणाºया ४२ गावांवरच राहणार असल्याने, ‘कौन कितने पानी मे’, याचा फैसला नेत्यांच्या पातळीवर होणार आहे.
वाळवा तालुक्यातील ९४ पैकी ९0 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. वाळवा तालुका हा इस्लामपूर आणि शिराळा अशा दोन विधानसभा मतदार संघात विभागला गेला आहे. त्यातील वाळवा तालुक्यातील ४२ गावे ही गेल्या ३0 वर्षांपासून पक्की मांड असणाºया जयंतरावांच्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लोकमताची ताकद अजमावणारी ही ग्रामपंचायत निवडणूक ठरणार आहे. या ४२ गावात ८ ते १0 हजारावर मतदार संख्या असणाºया रेठरेहरणाक्ष, ताकारी, बोरगाव, साखराळे, वाळवा, येडेमच्छिंद्र, बहे, भवानीनगर, शिगाव, बावची, बागणी अशा राजकीय वातावरण तापवणाºया ११ मोठ्या गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पातळीवर आजमितीस राष्ट्रवादीकडे जिल्हा परिषदेचे २ आणि पंचायत समितीचे ५ सदस्य आहेत, तर रयत विकास आघाडीकडे जि. प.चे २ आणि पंचायत समितीचे ३ सदस्य आहेत. काँग्रेसकडे पंचायत समितीचे २ सदस्य आहेत. बागणी जिल्हा परिषदेतील संभाजी कचरे अपक्ष असले तरी, त्यांची मदत राष्ट्रवादीलाच होणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. आमदार जयंत पाटील यांच्याकडे संस्थात्मक आणि संघटनात्मक बांधणीची ताकद आहे. यावेळी भाजपच्या शासनाने राज्यातील नगरपालिका निवडणुकीतील थेट नगराध्यक्ष निवडीत मिळालेले यश लक्षात घेऊन, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गावपातळीवरही थेट सरपंच पदाची निवडणूक लावून प्रस्थापित सत्ताधाºयांना खिंडीत गाठले आहे. वर्षानुवर्षाच्या एकाच सत्तेविरुध्द जनतेच्या मनात निर्माण झालेल्या असंतोषाचा लाभ उठविण्याचा ‘इस्लामपूर पॅटर्न’ याही निवडणुकीत राबविला गेल्यास त्याचे आश्चर्य वाटणार नाही.
थेट सरपंच पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गट आणि पुढे तीन—चार उपगटात विभागल्या गेलेल्या राष्ट्रवादीची एकसंधपणे आणि बेदिली न करता एकदिलाने लढणारी व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान आमदार जयंत पाटील यांना पेलावे लागणार आहे. त्यातच सत्ता गेली की निष्ठावंतांचे महत्त्व कळते, याचा अनुभव सध्या आमदार जयंत पाटील घेत आहेत. त्याउलट गेल्या ३५ वर्षांपासून ग्रामपंचायतीमधील अस्तित्वासाठी धडपडणाºया विरोधकांनाही नेकीने एकी करण्याचे न पेलवणारे कसब दाखवावे लागणार आहे. निमित्त ग्रामपंचायत निवडणुकीचे असले तरी, त्यातून विधानसभा निवडणुकीचे दिशादर्शन स्पष्ट होणार असल्याने, यंदाची निवडणूक साम, दाम, दंड, भेद अशा पातळीवर ढवळून निघणार आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात धुमशान होत असतानाच, शिराळा मतदार संघात समावेश असलेल्या ४७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, शिवसेनेचे अभिजित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. संपूर्ण वाळवा तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसचा कडीपत्ता कोणाला फोडणी देणार, हेसुध्दा स्पष्ट होईल.

हवा तापविणारी : गावे
इस्लामपूर मतदार संघातील निवडणूक होत असलेल्या ४२ ग्रामपंचायतींमधील ताकारी, साखराळे, बावची, बागणी येथे सर्वसाधारण पुरुष, बहे येथे सर्वसाधारण महिला, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, शिगाव येथे ओ. बी. सी. पुरुष, वाळवा येथे ओ. बी. सी. महिला, रेठरेहरणाक्ष येथे अनुसूचित जाती पुरुष, तर बोरगावमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. या मोठ्या ११ गावांमध्ये मतदार संघातील राजकीय वातावरण तापविण्याची क्षमता असल्याने या गावांत राजकीय चढाओढ टिपेला पोहोचणार आहे.
बनेवाडीत सरपंच नाही!
निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन सरपंच पदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये बनेवाडी या गावामध्ये अनुसूचित जाती पुरुष या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. मात्र या संपूर्ण गावातच या प्रवर्गातील एकही कुटुंब नसल्याने बनेवाडीत सरपंच पदाची निवडणूक होणार नाही. त्यामुळे येथील कारभार कोण पाहणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच मसुचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने, तेथे निवडणूक होणार नाही.

Web Title:  Rashtra Vikas Alliance - Desert Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.