भाजीपाल्याला कवडीमोल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:54+5:302021-05-29T04:20:54+5:30

एटीएममध्ये खडखडाट सांगली : शहरातील बहुतांश बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने खडखडाट झाला आहे. एक ते दोन दिवसाआड येत असलेल्या ...

Rate the price of vegetables | भाजीपाल्याला कवडीमोल दर

भाजीपाल्याला कवडीमोल दर

Next

एटीएममध्ये खडखडाट

सांगली : शहरातील बहुतांश बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने खडखडाट झाला आहे. एक ते दोन दिवसाआड येत असलेल्या शासकीय सुट्यांमुळे एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आधीच बँकेचे दैनंदिन कामकाज केवळ शासकीय कामासाठी सुरू आहे.

फूल उत्पादकांना फटका

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारपेठेअभावी फुले जागेवरच सुकून जात आहेत. त्यामुळे फूल उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

एसटीच्या सांगली विभागाला फटका

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे एसटीच्या सांगली विभागातील अनेक बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे महिन्याभरात मोठे नुकसान सोसावे लागत आहे. राज्य शासनाने नियम व अटींचे पालन करून बससेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

व्यावसायिकांची उपासमार

सांगली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संचारबंदी घोषित केली. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे रद्द करावे लागले. त्यामुळे कमाईचे चार महिने हातचे गेल्याने वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने या व्यावसायिकांना तातडीने मदत करण्याची गरज आहे.

तेलाच्या दरवाढीमुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले

सांगली : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात ग्रामीण भागात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत आहे. घरातील फोडणी महागल्याने आर्थिक बजेट कोलमडत आहे. साेयाबीन तेलाचे भाव १५० रुपयांवर पाेहोचले आहेत.

टाळ-मृदंगाचा आवाजही स्थिरावला

सांगली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळाचे दरवाजे बंद झाले आहेत. नित्य भजन, आरती बंद असल्याने टाळ-मृदंगाचा आवाजही स्थिरावला आहे.

वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सांगली : सांगली ते तासगाव रस्त्याच्या बाजूची वृक्षतोड केली जात असून, काही झाडे अज्ञातांनी जाळली आहेत. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पर्यावरणाचे नुकसान हाेण्याची भीती आहे. अनेकजण झाडांच्या बुंध्याला आग लावून दुसऱ्या दिवशी त्याची विल्हेवाट लावत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच

सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सातत्याने विजेच्या लपंडावामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. विद्युत उपकरणेही निकामी होत आहेत. बऱ्याच गावांमध्ये पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. सातत्याने तक्रारी वाढत आहेत.

शिराळा तालुक्यातील जंगल होतेय विरळ

शिराळा : जंगलात मोठ्या प्रमाणात झाडांची कटाई करण्यात येत आहे. त्यामुळे जंगले आता विरळ होत आहेत. अनेक ठिकाणी बिबट्याची भीती असल्याने चांदोली जंगलात कुणी फिरकत नसल्याचा फायदा घेत वृक्षतोड होत आहे.

पावसाळ्यापूर्वी मशागतीला वेग

करगणी : कोरोनाचे संकट डोक्यावर ठेवून शेतकरी भरउन्हात बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साह्याने शेती मशागत करीत आहेत. काही ठिकाणी पाणी पातळी खालावल्याने पाणीटंचाई भासू लागली आहे. हातपंप आटल्याने ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

सांगली : शहरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. येथे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधी सुटली आहे. तरी या शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Rate the price of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.