मालेवाडीच्या गुळाला सात हजाराचा दर : सरासरी दर वाढण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 07:24 PM2020-02-07T19:24:05+5:302020-02-07T19:26:26+5:30
सध्या गुळाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. दोन्ही तालुक्यातील गूळ कोल्हापूर व कºहाड बाजारपेठेत पाठवला जात आहे, तर काही गुºहाळघरांतून गूळ किरकोळ विक्रीसाठी स्थनिक बाजारात पाठविला जात आहे.
सहदेव खोत
पुनवत : वारणा पट्ट्यातील मालेवाडी येथील विद्या पाटील यांच्या ३० भेली गुळाला कºहाड येथील बाजारपेठेत सात हजाराचा दर मिळाला. चालू हंगामातील हा उच्चांकी दर आहे. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील राजेंद्र पाटील यांच्या २२ भेलींना चार हजारांचा दर मिळाला आहे. दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्याच्या तुलनेत शाहुवाडी तालुक्यातील गूळ दरात वरचढ ठरत आहे. कºहाड येथील उत्तमराव भाटवडेकर यांच्या दुकानात गुळाचे हे सौदे नुकतेच पार पडले.
वारणा पट्ट्यातील शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील गूळ आता दरात उभारी घेऊ लागला आहे. दरवर्षी संक्रांतीनंतर गूळ दरात वृद्धी होत असते. शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावांत गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तर शिराळा तालुक्यातील मोजक्या गावांतच गुºहाळठिय्ये सुरू आहेत. सध्या गुळाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. दोन्ही तालुक्यातील गूळ कोल्हापूर व कºहाड बाजारपेठेत पाठवला जात आहे, तर काही गुºहाळघरांतून गूळ किरकोळ विक्रीसाठी स्थनिक बाजारात पाठविला जात आहे.
क-हाड येथील भाटवडेकर अडत दुकानात नुकत्याच पार पडलेल्या सौद्यात मालेवाडी (ता. शाहुवाडी) येथील विद्या पाटील यांच्या ३० भेलींना सात हजार रुपये, २२ भेलींना सहा हजार ११० रुपये, कोतोली येथील अरुण पाटील यांच्या २३ भेलींना सहा हजार ३०० रुपये, जयवंत बामणे यांच्या २५ भेलींना पाच हजार ४००, कडवे येथील प्रमिला खोत यांच्या नऊ गूळ रव्यांना तीन हजार ८६० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.
सध्या गुळाची काही कलमे दरात उभारी घेत असली तरी, गुळाचा नीचांकी दर प्रति क्विंटल चार हजार रुपयांवर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
सेंद्रिय विक्रीतील गोलमाल
सध्या गु-हाळघरांच्या परिसरात रस्त्यावर अनेकांनी स्टॉल उभारून सेंद्रिय गूळ व काकवीची विक्री चालवली आहे. चांदोली तसेच कोकणात जाणारे पर्यटक सांगेल त्या दाराला याची खरेदी करीत आहेत. हा गूळ किंवा काकवी खरीच सेंद्रिय आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. सेंद्रिय उत्पादनासाठी उसाचा प्लॉटही सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला असावा लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.