राज्य विज्ञान प्रदर्शनात रत्नागिरीचे वर्चस्व
By admin | Published: April 9, 2017 11:50 PM2017-04-09T23:50:43+5:302017-04-09T23:50:43+5:30
कासेगावचा ओंकार जगताप प्रथम : पेठनाका येथे प्रदर्शन पाहण्यास नागरिकांची गर्दी
इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथील ४२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून रत्नागिरीच्या समृध्दी महाडिक हिने, तर माध्यमिक गटातून कासेगाव (सांगली) च्या ओंकार जगताप या बाल वैज्ञानिकांनी प्रथम क्रमांकाचे पुरस्कार पटकावले. या संपूर्ण विज्ञान प्रदर्शनावर रत्नागिरी जिल्ह्याने वर्चस्व ठेवत ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’वर आपले नाव कोरले. आदिवासी गटातून वैष्णवी नांगरे (चंद्रपूर) व शिल्पा घोडाम (यवतमाळ) विजेत्या ठरल्या.
या प्रदर्शनातील गटनिहाय विजेते प्रकल्प व विद्यार्थी असे.
प्राथमिक गट- समृध्दी महाडिक (प्रथम - मीनाताई ठाकरे विद्यालय, रत्नागिरी - पॅडस् आॅन फायर),
नाजर महाविष्णू (द्वितीय - आदर्श विद्यालय, चेंबूर - झाडावर चढणारे रोबोट), साजिया सय्यद (तृतीय - दत्तात्रय चव्हाण कन्या विद्यालय, सांगलीवाडी - शेंगा फोडणी यंत्र), ज्ञानेश्वरी देसाई (चतुर्थ - सरस्वती विद्यामंदिर, पाचल, रत्नागिरी, झेंडू शेतीची यशस्वीता -मूल्यवर्धित उपकरणे)
माध्यमिक गट - ओंकार जगताप (प्रथम - आझाद विद्यालय, कासेगाव वेस्ट बॉटल्स् अॅज अ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज), हिब्बा मुल्ला (द्वितीय - अल मोमीना स्कूल, मुंबई दक्षिण - इकोफ्रेंडली हायजेनिक बुम), अमेय जोग (तृतीय - वामनराव विद्यालय, मुलुंड-मुंबई, चिल्लर पे) धृतील प्रजापत (चतुर्थ - नंदुरबार)
प्राथमिकसाठी आदिवासी गटातून वैष्णवी नांगरे (प्रथम - जि. प. शाळा चेकली खिनवाडा, चंद्रपूर- नैसर्गिक वनौषधींपासून अगरबत्ती व दंतमंजन बनवणे), माध्यमिक गटातून शिल्पा घोडाम (प्रथम - डॉ. शामाप्रसाद मुखर्जी विद्यालय, घोटी, यवतमाळ, नदी-नाल्यातील कचरा उपकरणाच्या सहाय्याने बाहेर काढणे), शिक्षकांसाठीच्या लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शनात प्राथमिक गटातून संध्या राऊत (प्रथम - जि. प. शाळा, उचौली - भोर - ज्ञानरचनावादी पद्धतीतून लोकसंख्या शिक्षण), शिवाजी निकम (द्वितीय - जि. प. शाळा पिलखोड-जळगाव, लोकसंख्या नियंत्रण, पर्यावरण गरज), संजय येशी (तृतीय- जि. प. शाळा धोंडेगाव - नाशिक लेक वाचवा-देश वाचवा).
माध्यमिक गट - संदेश पांचाळ (प्रथम - बालमोहन विद्यामंदिर, दादर मुंबई - उजाडलं पण सूर्य कुुठे आहे), संदेश राऊत (द्वितीय - न्यू इंग्लिश स्कूल, टाळसुरे - दापोली, अनोखे ज्ञान), श्रीराम लोहार (तृतीय - न्यू इंग्लिश स्कूल, कवडदश-नाशिक, ज्ञानरचनावादी कमाल, लोकसंख्या शिक्षण घ्या किमान).
प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन प्राथमिक गट - प्रमोद हुडगे (प्रथम - जि. प. शाळा मळेगाव-चाकूर, ज्ञानरचनावादी जत्रा), संतोष गावंड (द्वितीय - जि. प. शाळा मांडाला, रायगड, मिनी तारांगण व बहुउद्देशीय साहित्य), माध्यमिक शिक्षक - सुरेश कुमार भगवत (प्रथम - आॅर्डीनन्स फॅक्ट्ररी सेकंडरी स्कूल, चंद्रपूर- मोबाईल मॅथेमॅटिकल लॅबोरेटरी), प्रीती बेंद्रे (द्वितीय - बालमोहन विद्यामंदिर, मुंबई दक्षिण - संवेदना).
प्रयोगशाळा सहायक, परिचर यांच्या प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन प्राथमिक गट - रघुनाथ आडिवरेकर (प्रथम - महांकाली इंग्लिश स्कूल आडिवरे -रत्नागिरी, मनोरंजनातून विज्ञान), माध्यमिक गट - कैलास नांद्रे (प्रथम अनु. माध्य. आश्रमशााळा सुखाणी - नंदूरबार, प्रकाश किरणांचे रहस्य).
यावेळी व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, आ. शिवाजीराव नाईक, संचालक सम्राट महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, डॉ. अचला जडे, डॉ. राजेंद्र शेंडे, प्राचार्य प्रकाश जाधव, प्रा. महेश जोशी उपस्थित होते. (वार्ताहर)