सांगलीत वळीवची पुन्हा हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:11+5:302021-05-16T04:25:11+5:30
सांगली : शहर व परिसरात शनिवारी वळीव पावसाच्या तुरळक सरींनी पुन्हा हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस ...
सांगली : शहर व परिसरात शनिवारी वळीव पावसाच्या तुरळक सरींनी पुन्हा हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस १८ मे पर्यंत कायम राहणार आहे.
शहरात सकाळपासून ढगांची दाटी झाली होती. दुपारी वादळ वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. काही वेळ ऊन-पावसाचा खेळही रंगला होता. सायंकाळपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरींनी हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १८ मे पर्यंत पाऊस कायम राहणार आहे. या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. वादळ वारेही या काळात वाहण्याची चिन्हे आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही दिवसांचा अपवाद वगळता पावसाने हजेरी लावली आहे. वादळ वारे, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने जिल्ह्याच्या काही भागात पिकांचेही नुकसान झाले आहे. तीव्र उन्हाच्या झळांनी त्रासलेल्या नागरिकांसाठी या पावसाने दिलासा दिला असला तरी तितकेच नुकसानही पावसाने केले आहे.
चौकट
किमान तापमानाचा उच्चांक
सांगली जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी किमान तापमानाने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शनिवारी किमान तापमान २६.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आजवरच्या जिल्ह्याच्या इतिहासात १८ मे २०१४ व २८ मे २०२० या दिवशी सर्वोच्च २५.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली होती. तो विक्रम मोडीत निघून आता नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.