या गरोदर महिलेचे प्राण कसे वाचले पहा... तुम्ही भविष्यात अशी मदत करू शकता..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 03:40 PM2019-07-06T15:40:28+5:302019-07-06T15:41:14+5:30
रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात
अविनाश कोळी ।
सांगली : रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात त्यांनी केलेल्या रक्तपुरवठ्यामुळे रुग्णालय प्रशासन व रुग्णाच्या नातेवाईकांनी संघटनेच्या कार्याला सलाम केला.
मुंबई अंधेरीच्या फडके हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या हर्षदा सपकाळ या गरोदर महिलेची प्रकृती अचानक बिघडली. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ४ पेक्षा कमी झाले होते. रक्तगटाची तपासणी केल्यानंतर येथील डॉक्टरांना तिचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असल्याचे लक्षात आले. त्यांनी मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये चौकशी केली, मात्र त्यांना हा रक्तगट कुठेच मिळाला नाही. दुसरीकडे महिलेची प्रकृती तर चिंताजनक होत होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक मेसेज व्हायरल केला. तो मेसेज फिरत तासगाव येथील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचे संस्थापक विक्रम यादव यांच्यापर्यंत गुरुवारी पोहोचला. त्यांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधला व रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. तातडीने रक्त मिळाले नाही, तर महिलेच्या जिवाला धोका होऊ शकतो, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
यादव यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी कार्वे (ता. कºहाड) येथील सुधीर निवृत्ती कणसे या रक्तदात्याशी संपर्क साधला आणि रुग्णाविषयी कल्पना दिली. मुंबईत वाहतूक कोंडी झाल्याने रक्त तातडीने पोहोचविणे हेच आव्हान होते. कणसेंंनी कºहाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये रक्तदान केले. ते रक्त गुरुवारी रात्री कºहाडमधून वातानुकूलित कार करून मुंबईत नेण्यात आले. त्या गरोदर महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. बॉम्बे ब्लड ग्रुपने दाखविलेल्या या तत्परतेने रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले. त्यांनी सहभागी संघटनेचे आभार मानले.