तिसरी लाट रोखण्यास तयार, जिल्ह्यात हजार बेड वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:33+5:302021-05-16T04:24:33+5:30

सांगली : कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता केंद्र शासनाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार व राज्याच्या टास्क फोर्सच्या प्रमुखांनी वर्तविली ...

Ready to stop the third wave, the district will grow a thousand beds | तिसरी लाट रोखण्यास तयार, जिल्ह्यात हजार बेड वाढणार

तिसरी लाट रोखण्यास तयार, जिल्ह्यात हजार बेड वाढणार

Next

सांगली : कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता केंद्र शासनाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार व राज्याच्या टास्क फोर्सच्या प्रमुखांनी वर्तविली आहे. ऑगस्ट महिन्यात येऊ घातलेल्या या संभाव्य कोरोना लाटेसाठी सांगली जिल्हा सज्ज असून, सुमारे १००० ऑक्सिजन बेड या काळात वाढू शकतात. काही ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणीही सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यात संकट आले तरी परतवून लावू, असा निर्धार प्रशासन करत आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षात शिरकाव करणाऱ्या कोरोनाने यंदाही राैद्ररूप धारण केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. दररोजची रुग्णसंख्या बाराशेच्या घरात गेल्यानंतर उपचारांसाठी बेड मिळणे मुश्कील झाले आहे. यावर मात करत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालये व कोविड केअर सेंटर्स याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेड उपलब्ध केले आहेत. तेही कमी पडत असल्याने आता साखर कारखाने, काही संस्था, संघटनांनी कोविड सेंटर्स सुरू केली आहेत. अजून काही प्रस्तावित आहेत.

प्रशासकीय यंत्रणा तयार

ऑक्सिजन

जिल्ह्याची सध्या दररोजची ऑक्सिजन मागणी ३५ ते ४० टन इतकी आहे. मागणीच्या तुलनेत ५ टक्के घट आहे. महापालिकेमार्फत आता स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत.

ऑक्सिजन बेड

जिल्ह्यात सध्या एकूण २ हजार ४५९ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कोविड केअर सेंटर्स

जिल्ह्यात एकूण ११ कोविड केअर सेंटर्स असून शहरात सामाजिक संस्थांमार्फतही अजून सेंंटर्स उभारली जात आहेत.

औषधी

सध्या औषधांचाच पुरवठा कमी आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा व फेविपिराविर गोळ्यांचा पुरवठा अनियमित असल्याने त्याची चिंता प्रशासनासमोर आहे.

चौकट

कोठे किती बेड

महापालिका क्षेत्र १७६०

डीसीएच २२७५

डीसीएचसी ५८७

सीसीसी ८५४

Web Title: Ready to stop the third wave, the district will grow a thousand beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.