गोटखिंडी विलगीकरण केंद्रातील काेराेनामुक्त रुग्णांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:46+5:302021-06-16T04:36:46+5:30
गोटखिंडीत संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील पहिले दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर सरपंच विजय लाेंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकमत न्यूज ...
गोटखिंडीत संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील पहिले दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर सरपंच विजय लाेंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथीलच दोन तरुण कोरोनाबाधित आल्यावर स्वत:हून या कक्षात दाखल झाले होते. त्यांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना काेराेनामुक्त जाहीर केले. ग्रामपंचायतीच्या वतीने गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सध्या येथील विलगीकरण कक्षात पाच रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर, सेविका उपचार करत आहेत. यावेळी सरपंच विजय लोंढे, नंदकुमार पाटील, लखन पठाण, अविनाश डवंग, प्रदीप पाटील, डॉ. वर्षाराणी मोहिते, सेविका आर. एस. कसबे, ग्रामसेवक डी. डी. कदम, सुभाष गुरव उपस्थित होते.