सांगलीत कोळी समाजातर्फे सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:58+5:302021-02-12T04:23:58+5:30

सांगली : महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रविवार, १४ फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी ...

Reception ceremony by Sangli Koli Samaj | सांगलीत कोळी समाजातर्फे सत्कार सोहळा

सांगलीत कोळी समाजातर्फे सत्कार सोहळा

Next

सांगली : महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रविवार, १४ फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी वधू-वर मेळावाही आयोजित केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी यांनी दिली.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सांगली नगरवाचनालयाच्या सभागृहात रविवारी दुपारी साडेबारा वाजता हा सत्कार कार्यक्रम होणार आहे. कोल्हापूर येथील सुभाष कोळी व दुय्यम निबंधक श्रीराम कोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात कोरोना काळात अत्यंत चांगले काम केल्याबद्दल सांगलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांचा तर कोल्हापूर येथील सुरेश कोळी व कासेगाव येथील डॉ. पुंडलिक पन्हाळे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. गौरव करताना केवळ समाजातीलच व्यक्ती नव्हे तर अन्य समाजातील व समाजासाठी राबणाऱ्या व्यक्तिंची निवड आम्ही केली आहे.

या गौरव सोहळ्यानंतर याचठिकाणी १५ व्या कोळी समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी नाेंद केलेल्या लोकांना एकत्र बोलावून विवाह जुळविण्यासाठी विनामूल्य सहकार्य केले जाते. या मेळाव्यात विधवा, विधूर व घटस्फोटीत यांच्या विवाहासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. हा मेळावा घेताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतराचा नियम पाळण्यात येणार असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. समाजातील सर्व विवाहोच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Reception ceremony by Sangli Koli Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.