शिराळा तालुक्यात विक्रमी १३० नवीन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:58+5:302021-05-05T04:42:58+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात सोमवारी विक्रमी १३० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले ...
शिराळा
: शिराळा तालुक्यात सोमवारी विक्रमी १३० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांमुळे पुन्हा एकदा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. फकिरवाडी येथे २५ रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ५० रुग्ण दाखल केल्याने या रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नाही.
यामध्ये फकिरवाडी २५, मांगले १३, शिराळा १२, वाकुर्डे बुद्रुक ७, बिऊर, मालेवाडी, पणुंब्रे तर्फ शिराळा प्रत्येकी ५, शिरसी ४, बेलेवाडी, भटवाडी, कापरी, खुजगाव, मोरेवाडी प्रत्येकी ३, आंबेवाडी, औढी, भाटशिरगाव, बिळाशी, चिंचोली, खेड, कोकरूड, मादळगाव, माणेवाडी, शेडगेवाडी, तडवळे प्रत्येकी २, आरळा, अंत्री बुद्रुक, चरण, देववाडी, गुढे, इंग्रूळ, कांदे, कणदूर, कार्वे, खवरेवाडी, कोतोली, कुसाईवाडी, पाडळी, पणुंब्रे वारूण, सागाव, सावर्डे, वीरवाडी प्रत्येकी १ असे १३० रुग्ण आढळून आले आहेत.
मिरुखेवडी या २३० लोकसंख्या असणाऱ्या वाडीवर १५ दिवसात ९० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईहून आलेले व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमुळे कोरोना प्रसार वाढत असल्याने प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत.
सध्या तालुक्यात ६३८ उपचाराखाली रुग्ण असून असून यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटर १०, शिराळा कोविड रुग्णालयात ७५, कोकरूड कोविड रुग्णालय २०, स्वस्तिक हॉस्पिटल १४, दालमिया सेंटर १, होम आयसोलेशनमध्ये ५०७ असे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.