तब्बल ६ फूट लांब केसांचा विक्रम; सांगलीच्या सुकन्येची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By संतोष भिसे | Published: August 26, 2022 08:08 PM2022-08-26T20:08:48+5:302022-08-26T20:09:34+5:30

श्रद्धाला त्याचे फळ आता मिळाले असून, ६ फूट लांब केसांसाठी तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

Record hair length of over 6 feet; Entry of Sukanya of Sangli in India Book of Records | तब्बल ६ फूट लांब केसांचा विक्रम; सांगलीच्या सुकन्येची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

तब्बल ६ फूट लांब केसांचा विक्रम; सांगलीच्या सुकन्येची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली - मुळची सांगलीची सुकन्या श्रद्धा सुदर्शन सदामते (सध्या पुणे) हिच्या सहा फुट लांबीच्या विक्रमी केसांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. सन २००५ मध्ये एका अपघातामुळे केशवपन करावे लागलेल्या श्र - खाने आपले केस वाढवण्याचा विचार केला आणि तो जिद्दीने अंमलात आणत २००५ पासून केसांना कधीही कात्री न लावता चांगले ६ फुट केस वाढवले. त्याच जिद्दीचे फळ म्हणून तिच्या सहा फुटी केसांची नोंद इंडिया बुकने घेतली आहे.

सांगली विश्रामबाग येथे राहणारी श्रद्धा सदामते २०१२ पासून शिक्षण व लग्नानंतर पुण्यात स्थायिक आहे. त्यांचा विवाह हेमंत वाघमारे यांच्याशी झाला. सन २००५ साली अकरावीत असताना तिचा दुर्देवाने एसटी अपघात झाला. त्यातून ती थोडक्यात बचावली, पण मेंदूला व पाठीला

गंभीर दुखापत झाल्याने तिची ब्रेन सर्जरी करण्यात आली. यामध्ये तिचें संपूर्ण केशवपन करावे लागले. दुखापत झाल्याच्या वेदनेसोबत ऐन तारुण्यात केस गमावणे हे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक होते. अशा अवस्थेत स्वत:ला स्विकारणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.

दुखापत बरी होण्यासाठी बरीच वर्षे लागली. दीड वर्षे तिने आरसा पाहिला नाही. शारीरिकदृष्ट्या बरं होण्यासाठी तीन वर्षे लागली. पण गेलेला आत्मविश्वास मिळवायला बराच कालावधी लोटला. यावेळी घरच्यांनी तेव्हा दिलेला आधार आणि त्यांचं खंबीरपणे पाठीशी उभं राहणं हेच औषधाचं काम करत होतं. अशाही परिस्थितीतून पुढे हार न मानता तीने १२ वी नंतर आर्किटेक्चर ग्रॅज्युएशन सांगलीत केले. तर आर्किटेक्चर कोर्समधील मास्टर्स डिग्रीसाठी ती पुण्यास गेली. जवळजवळ १६ वर्ष एकेक एम-एम केस वाढताना ती बघत आलीय.

श्रद्धाला त्याचे फळ आता मिळाले असून, ६ फूट लांब केसांसाठी तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. भारतातल्या सर्वात लांब केस असलेल्या महिलांमध्ये तिचे नाव नोंद झाले आहे. तिची बहीण डॉ. पूजा सदामते- नागराल ही 'हवा येऊ द्या-होवू द्या व्हायरल' ची उपविजेती आहे. बहिणीसह आई लता सदामते, वडील सुदर्शन सदामते व माऊ श्रेयश यांचं पाठबळ तिला वेळोवेळी मिळत आहे. त्या बळावरच ती जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Record hair length of over 6 feet; Entry of Sukanya of Sangli in India Book of Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.