चार महिन्यांतील सर्वात कमी बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:38 AM2020-12-14T04:38:57+5:302020-12-14T04:38:57+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येबाबतीत दिलासादायक वातावरण कायम आहे. गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद रविवारी झाली. दिवसभरात ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येबाबतीत दिलासादायक वातावरण कायम आहे. गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद रविवारी झाली. दिवसभरात १७ जणांना कोरोनाचे निदान होताना, ५० जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाला उतार लागला असून रविवारी पुन्हा एकदा कमी बाधितांची नोंद झाली. जिल्ह्यातील कडेगाव, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झालेली नाही. तसेच महापालिका क्षेत्रात सांगली शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
आरोग्य यंत्रणेच्यावतीने रविवारी आरटीपीसीआरअंतर्गत ४४२ जणांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यात ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच रॅपिड ॲन्टिजेनच्या ८०९ चाचण्यांमधून १० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्हयातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ३५२ रुग्णांपैकी ७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६० जण ऑक्सिजनवर, तर १० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील सातारा व कर्नाटकातील प्रत्येकी एकाला कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७२४९
उपचार घेत असलेले ३५२
कोरोनामुक्त झालेले ४५१७५
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२२
रविवारी दिवसभरात...
सांगली ०
मिरज शहर १
जत, खानापूर प्रत्येकी ४
कडेगाव ०
कवठेमहांकाळ ०
आटपाडी, मिरज, शिराळा प्रत्येकी १
पलूस ०
तासगाव, वाळवा प्रत्येकी २