सहा महिन्यातील सर्वांत कमी बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:58+5:302021-01-17T04:23:58+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला असतानाच, शनिवारी गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी १० कोरोनाबाधितांचीही नोंद झाली. ...
सांगली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला असतानाच, शनिवारी गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी १० कोरोनाबाधितांचीही नोंद झाली. ३० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असतानाच जत तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत असतानाच, मृत्यूचेही प्रमाण कमी होत आहे. चाचण्यांचेही प्रमाण नियंत्रित असल्याने बाधितांची संख्या कमी होत आहे. यापूर्वी १२ सर्वाधिक कमी बाधितांची नोंद झाली होती आता शनिवारी १० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी ‘आरटीपीसीआर’अंतर्गत १५८ जणांच्या नमुन्यांची चाचणी घेतली. त्यात पाचजणांचे कोरोनाचे निदान झाले आहे; तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ७३० चाचण्यांमधून सहाजण बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यातील सहा रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २०६ रुग्णांपैकी ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यांतील ३३ जण ऑक्सिजनवर, तर सातजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७९०७
उपचार घेत असलेले २०६
कोरोनामुक्त झालेले ४५९५८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४३
शनिवारी दिवसभरात
सांगली ३
मिरज २
आटपाडी १
जत २
कडेगाव ०
कवठेमहांकाळ ०
खानापूर १
मिरज १
पलूस ०
शिराळा ०
तासगाव ०
वाळवा ०