चौदा लाखांच्या बदल्यात ५० लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:41+5:302021-09-07T04:32:41+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, व्यावसायिक असलेले फिर्यादी मोहिते यांनी संशयित सावकार तावदारकरकडून पाच टक्के व्याजाने १४ लाख रुपये ...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, व्यावसायिक असलेले फिर्यादी मोहिते यांनी संशयित सावकार तावदारकरकडून पाच टक्के व्याजाने १४ लाख रुपये घेतले होते. याच्या बदल्यात मोहिते यांच्याकडून त्याने जादा व्याजाचे ५० लाख रुपये वसूल केले होते. मनमानी करत व कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देत हा प्रकार केला होता. त्यानंतरही जादा व्याजाची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर सावकाराने मोहिते यांची केरले (ता. शाहूवाडी) येथे असलेली जमीन रोखीने खरेदी केली आहे असे खरेदीपत्रही त्याने केले होते. यानंतरही त्याने आणखी व्याजाची मागणी सुरूच ठेवली होती. सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून दे नाहीतर तुझे काही खरे नाही, असे सांगून पैसे तर तुझ्याकडून वसूल करणारच, पण तू मरणार अशी धमकीही संशयितांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी संशयितांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
चाैकट
आणखीही सावकार रडारवर
अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देऊन त्याच्या वसुलीसाठी धमकाविणारे अन्यही सावकार आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने जादा व्याजासाठी सर्वसामान्यांना लुटणाऱ्या सावकारांचे धाबे दणाणले आहेत.