आबांच्या पुतळ्याला लालफितीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:31 PM2017-08-12T23:31:00+5:302017-08-12T23:31:20+5:30

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचा पुतळा उभारण्यासाठी लालफितीचा कारभार अडसर ठरत आहे. दहा महिने उलटूनही हा प्रस्तावच राज्य सरकारकडे गेला नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

A red bolster on the statue of Abe | आबांच्या पुतळ्याला लालफितीचा अडसर

आबांच्या पुतळ्याला लालफितीचा अडसर

googlenewsNext

- अशोक डोंबाळे

सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचा पुतळा उभारण्यासाठी लालफितीचा कारभार अडसर ठरत आहे. दहा महिने उलटूनही हा प्रस्तावच राज्य सरकारकडे गेला नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. प्रशासनाच्या या कारभाराबद्दल आबाप्रेमींतून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.
तासगाव तालुक्यातील अंजनी हे आबांचे मूळ गाव. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि तंटामुक्त गाव अभियानाचे जनक असलेल्या आबांनी गृहमंत्री म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. उपमुख्यमंत्रिपदाची शानही त्यांनी कामातून वाढविली. ‘ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा’ अशी ओळख झालेल्या आबांचे दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी अकाली निधन झाले. या लाडक्या नेत्याच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी आबाप्रेमींनी तासगाव बाजार समितीच्या आवारात पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या संचालक मंडळानेही त्यास सहमती दिली. राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी आबांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले पाहिजे, एवढ्या गतीने काम करा, अशी सूचना त्या वेळी पवार यांनी कार्यकर्ते आणि प्रशासनाला दिल्या होत्या, परंतु प्रस्तावच राज्य सरकारकडे पाठविला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुतळ्यासाठी ३७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी आणि तासगावच्या पोलीस अधिकाºयांची सहमती घेऊन, तो प्रस्ताव जिल्हा स्तरावर दाखल झाला आहे.

पुतळ्याची प्रतिकृती तयार
पुतळ्याचे काम कोल्हापुरातील प्रसिद्ध शिल्पकार संताजी चौगुले करणार आहेत. त्यांनी प्रतिकृती तयार करून सहा महिने झाले, पण पुतळा बनविण्याच्या सूचना तासगाव बाजार समितीकडून त्यांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुतळा अद्याप बसविला गेलेला नाही.

Web Title: A red bolster on the statue of Abe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.